corona virus : कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची १०० टक्के माहिती गोळा करा, जिल्हाधिकारी, आयुक्तांचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 06:49 PM2020-09-05T18:49:10+5:302020-09-05T18:52:06+5:30
शहरामध्ये दैनंदिन सर्व्हे करताना रुग्ण समजून आले पाहिजेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पथकांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा. १४३ कंटेन्मेंट झोनची कडक अंमलबजावणी करा. कंटेन्मेंट झोनमधील कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची १०० टक्के माहिती गोळा करा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले.
कोल्हापूर : शहरामध्ये दैनंदिन सर्व्हे करताना रुग्ण समजून आले पाहिजेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पथकांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा. १४३ कंटेन्मेंट झोनची कडक अंमलबजावणी करा. कंटेन्मेंट झोनमधील कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची १०० टक्के माहिती गोळा करा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले.
ह्यलोकमतह्णने शनिवारच्या अंकात ह्यकॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये हयगयह्ण या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्धीस दिले. याची दखल जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतली. त्यांनी तातडीने शनिवारी या संदर्भात अधिकारी, वैद्यकीय, समन्वय अधिकारी व प्रभाग समिती सचिव यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालय येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला.
जिल्हाधिकारी, आयुक्त यांनी केलेल्या सूचना
- होम आयसोलेट असलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवा.
- होम क्वारंटाईन बाहेर फिरताना आढळल्यास कारवाई करा.
- कंटेन्मेंट झोनमध्ये अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांनी दररोज भेटी दिल्या पाहिजेत.
- लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, शिक्षक व स्थानिक लोकांची मदत घ्या.
- शहरामध्ये होम टू होम सर्व्हे करा.
- सर्व्हे करताना इतर आजारांची लक्षणे (चिकनगुनिया, डेंग्यू, वगैरे) असलेल्या नागरिकांची माहिती गोळा करा.
- विशेष मोहिमेदरम्यान, गरज भासल्यास अँटिजेन टेस्ट करा.
- नोडल ऑफिसरांनी नेमलेल्या रुग्णालयात दैनंदिन भेट दिली पाहिजे.
कुटुंबकल्याण केंद्रामध्ये स्राव तपासणी
स्रावसाठी सीपीआर, डी. वाय. पाटील हॉस्पिटल व आयसोलेशन येथे गर्दी वाढत आहे. ती कमी करण्यासाठी महापालिकेच्या कुटुंब कल्याण केंद्रामध्ये स्राव तपासणीचे नियोजन करा, अशा सूचना दिल्या.