महास्वच्छता अभियानात एक टन कचरा गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:21 AM2021-03-22T04:21:28+5:302021-03-22T04:21:28+5:30

कोल्हापूर : शहराच्या विविध भागांमध्ये रविवारी आयोजित केलेल्या महास्वच्छता अभियानामध्ये एक टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. ...

Collect a ton of garbage in the sanitation campaign | महास्वच्छता अभियानात एक टन कचरा गोळा

महास्वच्छता अभियानात एक टन कचरा गोळा

Next

कोल्हापूर : शहराच्या विविध भागांमध्ये रविवारी आयोजित केलेल्या महास्वच्छता अभियानामध्ये एक टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. मोहिमेचा ९९वा रविवार होता. वृक्षप्रेमी संस्थे सह महापालिकेचे अधिकारी कर्मचार्‍यांनी सहभाग झाले होते.

यामुळे मोहिमेत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम ते शेंडापार्क चौक, रंकाळा टॅावर परिसर, दसरा चौक ते व्हिनस कॉर्नर परिसर, पंचगंगा नदी घाट व स्मशानभूमी परिसर, धैर्यप्रसाद हॉल ते सेवा रुग्णालय, रुईकर कॉलनी ते तावडे हॉटेल चौक परिसर येथे करण्यात आली.यात आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, स्वच्छतादूत अमित देशपांडे, स्वरा फाउंडेशनचे कार्यकर्ते, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर आदी उपस्थित होते.

वृक्षप्रेमी संस्थेकडून टाकाळा, माळी कॉलनीतील छत्रपती राजाराम उद्यानासह परिसरातील प्लॅस्टिक कचरा उठाव केला. लहान मुलांकडून पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी जलपात्र तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे, सतीश कोरडे, अक्षय कांबळे, विद्या पाथरे, सविता साळोखे, साजिद शेख, ओंकार कांबळे, सचिन पवार, शैलेश पोवार, तात्या गोवा वाला, अथर्व गोडसे आदी सदस्य उपस्थित होते.

चौकट

दोन जेसीबी, ४ डंपर, ६ आरसी गाडया, १ ट्रॅक्टर ट्रॉली, ३ औषध फवारणी पंपाचा वापर करण्यात आला. ही मोहीम महापालिकेच्या दीडशे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या साह्याने राबविण्यात आली.

फोटो २१०३२०२१-को ल- महापालिका

ओळी - स्वच्छता अभियानांतर्गत ९९व्या रविवारी टाकाळा माळी कॉलनी कॉलनीतील छत्रपती राजाराम उद्यानासह परिसराची स्वच्छता वृक्षप्रेमी संस्थेमार्फत करण्यात आली.

Web Title: Collect a ton of garbage in the sanitation campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.