जत्रा-यात्रा, महोत्सव स्थगित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 05:27 PM2020-03-13T17:27:10+5:302020-03-13T17:29:50+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनतेची सुरक्षितता आणि आरोग्यास प्रशासनाने प्राधान्य दिले असल्याने जनतेनेही नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी ...
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनतेची सुरक्षितता आणि आरोग्यास प्रशासनाने प्राधान्य दिले असल्याने जनतेनेही नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाºया जत्रा, यात्रा, महोत्सवांपासून लांब राहावे. जास्त करून त्या स्थगितच कराव्यात. असे आदेशच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी दिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या दक्षता व उपाययोजना बैठकीत जिल्हाधिका-यांनी वरील सूचना केल्या.
आता गावागावांत जत्रा, यात्रा, उरसाचा हंगाम सुरू झाला आहे. तसेच मेळावे, महोत्सव, शासकीय कार्यक्रमही प्रस्तावित आहेत. कोरोनाचा संसर्ग हवेतूनच होत असल्याने गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे. जत्रा-यात्रा हा परंपरेचा आणि गावाच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने ग्रामस्थांनीच यातून तोडगा काढण्याची गरज आहे. त्या दृष्टीने प्रशासनातर्फे खासकरून हे कार्यक्रम रद्दच करावेत. नसेल तर खास दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले.
वैद्यकीय व्यावसायिकांनी येणाºया रुग्णांची लक्षणे तपासून हिस्ट्रीची नोंद घ्यावी आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेला तत्काळ कळवावे. कोरोनाची भीती अजिबात बाळगू नये. मात्र आवश्यक ती खबरदारी जरूर घ्यावी, असेही जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.