जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी स्विकारला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 07:26 PM2021-07-15T19:26:00+5:302021-07-15T19:27:06+5:30

collector Kolhapur : नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडून गुरुवारी सकाळी पदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी डॉ. बलकवडे यांनी त्यांना कोल्हापूरची तसेच कोरोना स्थितीची माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही त्यांचे स्वागत केले.

Collector Rahul Rekhawar accepted the post | जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी स्विकारला पदभार

कोल्हापुरचे नूतन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी गुरूवारी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडून पदाचा कार्यभार स्विकारला.

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी स्विकारला पदभार कर्मचाऱ्यांच्यावतीने व संघटनांच्यावतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत

कोल्हापूर : नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडून गुरुवारी सकाळी पदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी डॉ. बलकवडे यांनी त्यांना कोल्हापूरची तसेच कोरोना स्थितीची माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही त्यांचे स्वागत केले.

मावळते जिल्हाधिकारी दौलत देसाई सध्या रजेवर असल्याने महापालिका आयुक्त डॉ. बलकवडे यांच्याकडे प्रभारी जिल्हाधिकारी पदाची धुरा होती. अकोल्यात महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक असलेले राहूल रेखावार यांची कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून मंगळवारी नियुक्ती झाली. पदभार स्विकारल्यानंतर लगेच ते केंद्रीय समितीच्या बैठकीला उपस्थित राहिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांच्यावतीने व संघटनांच्यावतीने त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. रेखावार यांनी सिंधुदुर्ग येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली येथील इटापल्ली, नागपूर येथे सहायक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले आहे. हिंगोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, परभणी महापालिकेत आयुक्त, धुळे येथे जिल्हाधिकारी, महावितरण औरंगाबादला सहायक संचालक, बीडचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले.
 

Web Title: Collector Rahul Rekhawar accepted the post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.