जिल्हाधिकारी कार्या-बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:13 AM2021-01-08T05:13:50+5:302021-01-08T05:13:50+5:30
कोल्हापूर : विभागीय आयुक्त पुणे यांनी चंदगड तालुक्यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांची निवडणूक निरीक्षक म्हणून निवड केली ...
कोल्हापूर : विभागीय आयुक्त पुणे यांनी चंदगड तालुक्यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांची निवडणूक निरीक्षक म्हणून निवड केली आहे.
कांबळे हे ९ तारखेला मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या दुसऱ्या प्रशिक्षणाच्या दिवशी, प्रचार कालावधित, मतदान व मतमोजणीच्या दिवशी चंदगड तहसील कार्यालयास भेट देतील.
--
रिक्षा व काळी-पिवळी टॅक्सीचे पासिंग ३१ जुलैपर्यंत
कोल्हापूर : रिक्षा व काळी-पिवळी टॅक्सी वाहनांना ३१ जूलैपर्यंत पासिंग करून घेता येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी मंगळवारी दिली.
रिक्षांसाठी १५ ते २० वर्षे व काळी-पिवळी टॅक्सीसाठी १६ ते २२ वर्षे वयोमान हा कालावधी ठरवण्यात आला आहे. वाढ करण्यात आलेल्या मुदतीचा वाहनधारकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपली वाहने मुदतीत स्क्रॅप करावीत. नवीन परवान्यांचा लाभ घेऊन आपले परवाने वैध करून घ्यावेत, असे आवाहन अल्वारिस यांनी केले आहे.
--