जिल्हाधिकारी कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:16 AM2021-06-30T04:16:32+5:302021-06-30T04:16:32+5:30
कोल्हापूर : घरेलू कामगारांना शासनाने जाहीर केलेले अनुदान खात्यावर वर्ग करण्यासाठी कोल्हापूर क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत घरेलू कामगार व ...
कोल्हापूर : घरेलू कामगारांना शासनाने जाहीर केलेले अनुदान खात्यावर वर्ग करण्यासाठी कोल्हापूर क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत घरेलू कामगार व कामगार संघटनांनी त्यांचे बँक खाते, आधार कार्ड व इतर तपशील महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळाच्या ttps://public.mlwb.in/public या लिंकद्वारे लवकरात लवकर अद्ययावत करावेत, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी केले आहे.
कोरोना काळात राज्य शासनाने नोंदणीकृत घरेलू कामगारांना आर्थिक मदत म्हणून १५०० रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. मात्र, काही घरेलू कामगारांनी नोंदणीच्या वेळी त्यांची बँक खाते, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक ही माहिती न दिल्याने, तसेच काही बँकांचे विलीनीकरण झाल्यामुळे अनुदान त्यांच्या खात्यात वर्ग करण्यास अडचण येत आहे. तरी या कामगारांची माहिती अद्ययावत करण्यात यावी. यात काही अडचण आल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, शाहुपुरी, व्यापारी पेठ, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
--
ग्राहक सुनावणी सुरू होणार
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा ग्राहक आयोगातील व महाराष्ट्र राज्य ग्राहक वाद आयोग परिक्रमा खंडपीठमधील ग्राहक तक्रारी व अपिलांची प्रत्यक्ष सुनावणी लवकरच सुरू होईल, अशी माहिती ग्राहक वाद आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती पी. आर. बोरा यांनी दिली.
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशनच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रताप जाधव यांनी कोरोनामुळे ग्राहक तक्रारी व अपिलांची तातडीने सुनावणी सुरू व्हावी, अशी मागणी केली. जिल्हा ग्राहक आयोगाच्यावतीने अध्यक्षा सविता भोसले यांनी स्वागत केले. या वेळी ॲड. रणजित गावडे, ॲड. व्ही. एन. घाटगे उपस्थित होते.
---