अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेने कॉलेज कॅम्पस फुलला, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 06:34 PM2020-12-03T18:34:50+5:302020-12-03T18:37:27+5:30
coronavirusunlock, college, admisson, kolhapurnews कोरोना आणि एसईबीसी आरक्षणाच्या स्थगितीमुळे लांबणीवर पडलेली शहरातील अकरावीची प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया गुरुवारपासून पूर्ववत सुरू झाली. प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थिती लावल्याने विविध कॉलेज कॅम्पस गर्दीने फुलले. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.
कोल्हापूर : कोरोना आणि एसईबीसी आरक्षणाच्या स्थगितीमुळे लांबणीवर पडलेली शहरातील अकरावीची प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया गुरुवारपासून पूर्ववत सुरू झाली. प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थिती लावल्याने विविध कॉलेज कॅम्पस गर्दीने फुलले. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.
केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने शहरातील विविध ३४ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीची निवड (गुणवत्ता) यादी बुधवारी (दि. २)जाहीर केली. प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयांची माहिती या समितीने विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे कळविली.
प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यासाठी महाविद्यालयांना सूचना केली. त्यानुसार गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. शहाजी कॉलेज, महावीर महाविद्यालय, विवेकानंद कॉलेज, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, न्यू कॉलेज, गोखले कॉलेज, कमला कॉलेज, राजाराम महाविद्यालय, डीआरके कॉमर्स कॉलेज, आदी महाविद्यालयांमध्ये कोरोनाबाबतची दक्षता घेऊन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली.