महाविद्यालयात होणाऱ्या प्रथम वर्षाच्या परीक्षाही ऑनलाइन घ्याव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:23 AM2021-04-10T04:23:25+5:302021-04-10T04:23:25+5:30
प्रथम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर होणार आहेत. या परीक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन होणार असल्याचे समजते. मात्र, कोरोनाचा वाढता ...
प्रथम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर होणार आहेत. या परीक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन होणार असल्याचे समजते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रथम वर्षाची परीक्षा ही ऑनलाईन व्हावी. प्राध्यापकांनी आपल्या विषयाच्या बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांची 'क्वेश्चन बँक' तयार करावी. ही बँक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी. या 'क्वेश्चन बँक'मधील प्रश्न परीक्षेसाठी विचारावेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना कमी कालावधीमध्ये अभ्यास करणे शक्य होईल. सध्या विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेबद्दल संभ्रम आहे. कुलगुरूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधून संभ्रम दूर करावा. यामुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊ शकतील, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. कुलगुरूंना निवेदन दिलेल्या शिष्टमंडळात अधिसभा सदस्य पंकज मेहता, संजय परमणे, श्रीनिवास गायकवाड यांचा समावेश होता. दरम्यान, या परीक्षेबरोबरच निकाल, विद्यार्थी सुविधा केंद्र, आदी विषयांवर कुलगुरूंसमवेत चर्चा केली असल्याचे मेहता यांनी सांगितले.
चौकट
दुसऱ्या, तिसऱ्या वर्षाबाबतही निर्णय घ्या
दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या परीक्षाही ऑनलाइन घ्याव्यात. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांना संपर्कासाठी हेल्पलाइन सुरू करावी. भविष्यात नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीजन्य परिस्थितीत ऑनलाइन परीक्षा हाच पर्याय आहे. त्या दृष्टिकोनातून सिद्धता होणे गरजेचे आहे. यासाठी पूरक अभ्यासक्रम आणि बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेसाठी प्रश्नसाठा प्राध्यापकांनी करावा, याबाबतच्या सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना द्याव्यात, अशी मागणी या सदस्यांनी केली आहे.