तेलवे येथील महाविद्यालयीन युवकाचा नदीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:17 AM2021-06-03T04:17:48+5:302021-06-03T04:17:48+5:30
तो आकरावीच्या वर्गात शिकत होता. त्याला पोहता येत नव्हते. त्यामुळे नदीकाठावर कमी पाण्याच्या ठिकाणी तो पोहत होता. त्याचे ...
तो आकरावीच्या वर्गात शिकत होता. त्याला पोहता येत नव्हते. त्यामुळे नदीकाठावर कमी पाण्याच्या ठिकाणी तो पोहत होता. त्याचे मित्र नदीपलीकडे पोहत गेले असताना तो खोल पाण्यात शिरला. बघता बघता तो नदीत बुडाला. मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु तो काही सापडला नाही. दुपारी एक वाजता बुडालेल्या प्रसन्नला शोधण्यासाठी पाच तासांची प्रतीक्षा करावी लागली. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयातून मराठा सोल्जर फोर्सची तुकडी शोधकार्यासाठी मागविण्यात आली. तोपर्यंत स्थानिक नागरिक तसेच कोलोली गावचे भीमराव पाटील, स्वप्निल पाटील, आनंदा चिंदके, विनय खोत, कपिल पाटील, नितीन सावंत, किरण लव्हटे, प्रकाश चिंदके यांनी त्याचा शोध घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेह पाण्याबाहेर काढताच त्याच्या वडिलांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. तो कोल्हापूर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. मनमिळावू व हसर्या स्वभावाच्या प्रसन्नच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या मित्रांनी नदीघाटावर मोठी गर्दी केली होती. प्रसन्नच्या मित्रांनी फोडलेला टाहो उपस्थितांचे मन सुन्न करणारा प्रसंग होता. त्याच्या वडिलाचा गादी कारखाना आहे. त्याच्या पश्चात एक भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी जाधव, विलास जाधवर, पोलीस नाईक जलराज देसाई हे तपास करीत आहेत.