महाविदयालये ऑफलाईन नाही तर ऑनलाईनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:29 AM2021-07-14T04:29:56+5:302021-07-14T04:29:56+5:30
कोल्हापूर : महाविद्यालयांचे सत्र १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे; पण अजूनही कोरोना आजाराच्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. ...
कोल्हापूर : महाविद्यालयांचे सत्र १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे; पण अजूनही कोरोना आजाराच्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे ऑफलाईनऐवजी ऑनलाईन महाविद्यालये सुरू होतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
शिवसंपर्क अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमास आल्यानंतर ते शासकीय विश्रामगृहात बोलत होते. ते म्हणाले, उच्चशिक्षण मंत्री पदावरून अनेक चांगले निर्णय घेतले आहेत; पण कोरोनामुळे अनेक अडचणी आल्या आहेत. बारावी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे सीईटीच्या परीक्षा घेण्यात आलेल्या नाहीत; पण परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक जाहीर केली आहे. विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक पदासाठी निवड प्रक्रिया तज्ज्ञातर्फे केली जात आहे. त्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणणे चुकीचे आहे. कोकणातील नाणार प्रकल्पासाठी विरोधी पक्षनेत्यांनी सत्तेत असताना प्रयत्न केले असते तर बरे झाले असते. आता आमच्यासाठी हा विषय संपला आहे.
चौकट
पक्षाचा कार्यक्रम तिथे कसा ?
शासकीय विश्रामगृहात मंत्री, आमदार, खासदारांच्या पत्रकार परिषदा, शासकीय कार्यक्रम होतात. पण परिसरात भगवे ध्वज लावून शिवसेनेने शिवसंपर्क अभियानाच्या उद्घाटनचा कार्यक्रम चक्क विश्रामगृहात घेतला, या कार्यक्रमाची परवानगी घेतली होती का, असे प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाले.