मूलभूत सुविधांसाठी महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत - सुनील कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 02:07 PM2018-11-28T14:07:33+5:302018-11-28T14:14:41+5:30

जनसामान्यांचे जीवनमान, पर्यावरणाचा स्तर उंचावण्यासाठी आणि स्वच्छतेशी संबंधित मूलभूत सुविधांसाठी महाविद्यालये व स्वयंसेवी संस्था यांनी विशेष सहभाग घेऊन प्रयत्न करणे

Colleges should try for basic facilities - Sunil Kulkarni | मूलभूत सुविधांसाठी महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत - सुनील कुलकर्णी

मूलभूत सुविधांसाठी महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत - सुनील कुलकर्णी

Next
ठळक मुद्देकेआयटी’मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा प्रारंभअभ्यासक्रमातून मिळविलेले ज्ञान व कौशल्य हे सामाजिक विकास व पर्यावरण संवर्धनासाठी वापरावे.

कोल्हापूर : जनसामान्यांचे जीवनमान, पर्यावरणाचा स्तर उंचावण्यासाठी आणि स्वच्छतेशी संबंधित मूलभूत सुविधांसाठी महाविद्यालये व स्वयंसेवी संस्था यांनी विशेष सहभाग घेऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘केआयटी’चे उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी येथे केले.

केआयटी कॉलेजमधील ग्लोबल अँड नॅशनल पर्स्पेक्टिव्ह आॅफ सस्टेनेबल सॅनिटेशन अप्रोचेस अँड टेक्नॉलॉजी इंटरव्हेंशन्स या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रारंभावेळी ते बोलत होते. यावेळी म्हैसूरच्या जेएसएस विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्रा. डॉ. के. एस. लोकेश प्रमुख उपस्थित होते. ‘केआयटी’चा पर्यावरण अभियांत्रिकी विभाग व राष्ट्रीय नगर कार्य संस्थान यांच्यावतीने हा अभ्यासक्रम आयोजित केला आहे. डॉ. कुलकर्णी म्हणाले,

अभ्यासक्रमातून मिळविलेले ज्ञान व कौशल्य हे सामाजिक विकास व पर्यावरण संवर्धनासाठी वापरावे. डॉ. लोकेश यांनी मूलभूत स्वच्छताविषयक समस्या आणि संबंधित पायाभूत सुविधा याविषयी विचार मांडले. त्यांनी इको टॉयलेटची संकल्पना मांडली. एकंदरीत सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ परिसर या मूलभूत गोष्टींमध्ये असणारा लोकसहभाग याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. ‘केआयटी’चे संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांनी केआयटीच्या ३५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. पर्यावरण अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. अक्षय थोरवत यांनी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची माहिती सांगितली. किरण केडगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रवी निकम यांनी आभार मानले.

कोल्हापुरात केआयटी कॉलेजमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रारंभावेळी प्रा. डॉ. के. एस. लोकेश यांचे स्वागत सुनील कुलकर्णी यांनी केले. यावेळी व्ही. व्ही. कार्जिन्नी, आदी उपस्थित होते.
 

 

Web Title: Colleges should try for basic facilities - Sunil Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.