‘गोडसाखर’ पतसंस्था निवडणुकीत साखर कारखान्याची रंगीत तालीम

By Admin | Published: February 29, 2016 12:32 AM2016-02-29T00:32:56+5:302016-02-29T00:56:50+5:30

६ मार्चला मतदान : श्रीपतराव शिंदे, शहापूरकर विरुद्ध चव्हाण सामना

Color training of sugar factories in 'Godsakhar' Credit Union elections | ‘गोडसाखर’ पतसंस्था निवडणुकीत साखर कारखान्याची रंगीत तालीम

‘गोडसाखर’ पतसंस्था निवडणुकीत साखर कारखान्याची रंगीत तालीम

googlenewsNext

रमा मगदूम -- गडहिंग्लज  साखर कारखाना कर्मचाऱ्यांच्या निवडणुकीतच सत्ताधारींची कसोटी लागली आहे. या निवडणुकीत उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण समर्थक विरुद्ध माजी अध्यक्ष अ‍ॅड़. श्रीपतराव शिंदे व डॉ. प्रकाश शहापूरकर समर्थक असाच सामना आहे. ही निवडणूक म्हणजे कारखान्याच्या निवडणुकीची रंगीत तालीमच मानली जाते. त्यामुळे पतसंस्थेत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.१९८० मध्ये या पतसंस्थेची स्थापना झाली. कामगारांना प्रापंचिक कारणासाठी अर्थसहाय्य करण्याच्या उद्देशानेच या संस्थेची स्थापना झाली. दरम्यान अनेकवेळा कारखान्यात सत्तांतर झाले. मात्र त्याचा परिणाम पतसंस्थेच्या कामकाजावर कधीच झाला नाही. सर्व कामगारांनी एकजुटीने पतसंस्था चालविली. त्यामुळे पतसंस्थेच्या आजवरच्या सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी तत्कालीन अध्यक्ष अ‍ॅड़ श्रीपतराव शिंदे आणि विद्यमान उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यात मतभेद झाले. त्यातूनच शिंदेंच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना अध्यक्षपदावरुन हटविण्यात आले. त्यानंतर मुश्रीफ यांच्या सहकार्याने कारखाना ब्रीक्स कंपनीला चालवायला देण्यात आला. त्यानंतरच्या राजकीय घडामोडीमुळेच निवडणुकीतील बिनविरोधाच्या प्रयत्नाला ‘खो’ बसला.
गडहिंग्लज कारखान्यांच्या सर्व कर्मचारी या पतसंस्थेचे सभासद आहेत. कारखान्याचे संस्थापक स्व.आप्पासाहेब नलवडे, माजी अध्यक्ष अ‍ॅड़ शिंदे व डॉ. शहापूरकर यांनी नेमलेले कर्मचारी अजूनही
त्यांना मानतात. कामगार ते काखान्याच्या उपाध्यक्षपदी पोहचलेले चव्हाण यांनाही मानणारे काही निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शिंदे व शहापूरकर या
दोघांना मानणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन चव्हाण समर्थकांना अव्हान दिले आहे. त्यामुळेच नेत्यांच्या प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीतही मोठी चुरस आहे.
उपाध्यक्ष चव्हाण यांना हरविण्यासाठी कारखाना निवडणुकीत शिंदे व शहापूरकर यांच्यासह मुश्रीफ विरोधी सर्वच पक्ष गट एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. राजकीय ध्रुवीकरणाची पहिली प्रतिक्रिया पतसंस्थेच्या निवडणुकीलाही प्राप्त झाली आहे. म्हणूनच याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


पतसंस्थेचे ६९0 सभासद
गोडसाखर पतसंस्थेच्या सभासदांची एकूण संख्या ६९० इतकी आहे. त्यामध्ये अ‍ॅड़ शिंदे यांच्या कारकीर्दीत नेमलेले ४२९ आणि डॉ. शहापूरक यांच्या कारकीर्दीतील १४० कर्मचारी आहेत. त्यामुळेच दोघांची मिळून किमान ४० मते मिळतील असा विरोधी पॅनेलचा दावा आहे.


कामगारांतही दुफळी
गोडसाखर पतसंस्थेत प्रकाश चव्हाण समर्थकांचे सत्ताधारी गौळदेव पॅनेल आणि शिंदे व शहापूरकर समर्थकांचे विरोधातील गौळदेव परिवर्तन पॅनेल असा चुरशीचा दुरंगी सामना होत आहे. ६ मार्च रोजी मतदान व निकाल आहे. कारखान्याच्या २४,४५० सभासदांपैकी कर्मचारी पती-पत्नी सभासदांची संख्या सुमारे १८०० आहे. सेवेतील कामगारांच्या थकीत पगाराप्रमाणेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमादेखील अद्याप मिळायच्या आहेत. त्यामुळेच कामगारांसह त्यांच्या नात्या-गोत्यांची मते निर्णायक ठरणार अहेत. कंपनीला कारखाना चालवायला देऊन शेतकऱ्यांच्या ऊस बिलासह कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर देण्याचा प्रयत्न चव्हाणांनी केला. मात्र विधानसभा निवडणुकीत प्रचाराची सक्ती झाली. यामुळेच कामगारातही दुफळी पडली आहे.

Web Title: Color training of sugar factories in 'Godsakhar' Credit Union elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.