कोरोनाला विसरून कोल्हापूरकरांकडून रंगांची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:20 AM2021-04-03T04:20:16+5:302021-04-03T04:20:16+5:30

रांगोळी, चित्रे काढून रंगपंचमी साजरी निसर्गमित्र संस्थेने केलेल्या आवाहनानुसार कोल्हापुरातील विविध परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी वनस्पतीजन्य रंगांचा वापर करून रंगपंचमी ...

Coloring from Kolhapur by forgetting Corona | कोरोनाला विसरून कोल्हापूरकरांकडून रंगांची उधळण

कोरोनाला विसरून कोल्हापूरकरांकडून रंगांची उधळण

Next

रांगोळी, चित्रे काढून रंगपंचमी साजरी

निसर्गमित्र संस्थेने केलेल्या आवाहनानुसार कोल्हापुरातील विविध परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी वनस्पतीजन्य रंगांचा वापर करून रंगपंचमी साजरी केली. त्यांनी नैसर्गिक रंगांव्दारे रांगोळी, चित्रे काढली. या उपक्रमामध्ये एकूण ९५ विद्यार्थी सहभागी झाले.

चौकट

‘सेल्फी’ टिपून लगेच पोस्ट

काही युवक, युवतींनी विविध रंगांनी आपले चेहरे आर्कषकपणे रंगविले होते. रंगपंचमी साजरी करतानाचे विविध क्षणांचा सेल्फी टिपून तो लगेच तरुणाईकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येत होता.

चौकट

घरी थांबण्याला प्राध्यान्य

गुड फ्रायडेची सुटी असल्याने शाळा, महाविद्यालये, बँका, शासकीय कार्यालये बंद होती. सुटीमुळे अनेकांनी घरी थांबण्याला प्राध्यान्य दिले. काहींनी मात्र, पन्हाळा, जोतिबा, आदी पर्यटनस्थळी छोटी सहल काढली.

फोटो (०२०४२०२१-कोल-रंगपंचमी २२) : कोल्हापुरात शुक्रवारी रंगपंचमीनिमित्त रविवारपेठेतील युवक अभिजीत सूर्यवंशी याने असा चेहरा रंगविला होता. (छाया : आदित्य वेल्हाळ)

फोटो (०२०४२०२१-कोल-रंगपंचमी २३) : कोल्हापुरात शुक्रवारी कोरोनाला विसरून तरूणाईने रंगपंचमी साजरी केली. ताराबाई पार्क परिसरातील युवतींनी असा सेल्फी टिपून आनंद व्यक्त केला. (छाया : राज मकानदार)

फोटो (०२०४२०२१-कोल-रंगपंचमी २४) : कोल्हापुरात शुक्रवारी कोरोनाला विसरून तरुणाईने रंगांची उधळण केली. लक्ष्मीपुरी परिसरात काही युवकांनी पाण्याचा शॉवर लावून रंगपंचमी साजरी केली. (छाया : राज मकानदार)

Web Title: Coloring from Kolhapur by forgetting Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.