बेळगावात आढळला रंगहीन दुर्मिळ धामण सर्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 06:49 PM2017-09-04T18:49:47+5:302017-09-04T18:52:32+5:30
रंगहीन असा अतिशय दुर्मिळ धामण सर्प बेळगावातील भाग्यनगर सहावा क्रॉस येथील मधु हलशिकर यांच्या कंपाऊंड मध्ये आढळला आहे.
बेळगाव दि. ४ : रंगहीन असा अतिशय दुर्मिळ धामण सर्प बेळगावातील भाग्यनगर सहावा क्रॉस येथील मधु हलशिकर यांच्या कंपाऊंड मध्ये आढळला आहे.
हलशिकर यांच्या कंपाऊंड मध्ये शिरल्यावर सर्प मित्र आनंद चिट्टी यांना पाचारण करण्यात आले कंपाऊंड मधील इलेक्ट्रिकल बॉक्स मध्ये बसलेल्या बसलेल्या त दुर्मिळ सापास आनंद चिट्टी यांनी मोठ्या शिताफीने पकडलं. पकडलेला हा दुर्मिळ सर्प लाख सर्पांतुन एक आढळतो रंगहीन (albino snake) असेदेखील त्याला संबोधन केलं जातंय.
अनगोळ येथील सह्याद्री कॉलनीत देखील असा सर्प सहा महिन्यांपूर्वी पकडला होता अशी माहिती सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी दिली आहे. ते हा सर्प जंगलात सोडून देणार आहेत
रंगहीन albino म्हणजे काय?
सपार्चा मुळ रंग जाऊन त्या त्या ठिकाणी पांढरा-गुलाबी-पिवळसर रंग प्राप्त होतो. त्वचेतील मिलेनियमचे प्रमाण कमी झाल्याने हा त्वचा रोग होतो, मात्र यामुळे सर्पाचे सौन्दर्य अधिक खुलले गेल्याने त्याला शापित सौन्दर्य म्हटलं जातं.
या त्वचेच्या विकारामुळे सर्पांना ऊन किंवा थंडीचा अधिक त्रास होतो. त्वचेसोबत डोळे आणि जीभ देखील गुलाबी लाल रंगाची होते. त्यामुळं दृष्टी कमकुवत होते. या रंगामुळेच असे सर्प शत्रूच्या नजरेस पडतात. असे सर्प जास्त दिवस जगत देखील नाहीत
आनंद चिट्टी,
सर्पमित्र, बेळगाव.