‘कलर्स’ प्रस्तुत ‘सखी मंच रिमझिम गाणी झलक सुहानी’

By admin | Published: July 26, 2016 12:02 AM2016-07-26T00:02:30+5:302016-07-26T00:19:52+5:30

गुरुवारी आयोजन : नाट्यसंगीत, नृत्य, मनोरंजनाची मस्तीभरी ‘झलक दिखला जा’

'Colors' presented 'Sakhi Forum Rimzim Songs Thakla Suhani' | ‘कलर्स’ प्रस्तुत ‘सखी मंच रिमझिम गाणी झलक सुहानी’

‘कलर्स’ प्रस्तुत ‘सखी मंच रिमझिम गाणी झलक सुहानी’

Next

कोल्हापूर : आला पुन्हा नव्यानं ओल्या मातीचा सुगंध, मन झाले एकवार पुन्हा बेहोश, बेधुंद. पहिला पाऊस पडून गेलेला आहे. धरणीमातेने हिरवाकंच शालू पांघरला आहे. ती पावसाने चिंब झाली आहे. रसिकतेला आव्हान देणाऱ्या रोमॅँटिक वातावरणात हळूच सुरेल तान कानांवर पडावी, मन बेभान होऊन नाचू-गाऊ लागावं असं वाटतं असतं. नेमका या वातावरणाचा मूड ओळखून, आपल्या असंख्य प्रेक्षकांच्या मनांतील भाव ओळखून पुन्हा एकदा ‘कलर्स’ प्रस्तुत ‘लोकमत सखी मंच’ घेऊन येत आहे, ‘रिमझिम गाणी, झलक सुहानी.’
हा कार्यक्रम गुरुवार, दि. २८ जुलै रोजी दुपारी चार वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे होणार आहे. गोवा आणि महाराष्ट्रात ज्याप्रमाणे ‘लोकमत सखी मंच’ने आपल्या सदस्यांसाठी चौफेर कार्यक्रम देऊन त्यांच्या मनात घर केलं आहे, त्याचप्रमाणे ‘कलर्स’ने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या कार्यक्रमाच्या स्वरूपात पुन्हा एकदा ‘कलर्स’ व ‘लोकमत सखी मंच’ आपल्या भेटीला येत आहेत. या कार्यक्रमात असणार आहेत आपल्या मनातील गाणी, आपल्या आवडीची पाऊसगाणी आणि सोबतच नृत्याची ‘झलक दिखला जा’ स्पर्धा! कार्यक्रमाआधी नृत्यस्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ‘सखीं’नी कार्यक्रमस्थळी अर्धा तास अगोदरर् नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नावनोंदणी केलेल्या ‘सखीं’मधून दहा भाग्यवान सखींची अंतिम फेरीसाठी निवड होणार आहे.
१० स्पर्धकांना जॅकलीन फर्नांडिसच्या गाण्यांवर नृत्य करून दाखवायचे आहे. त्यामधून परीक्षक निवडतील अंतिम तीन विजेते. या कार्यक्रमासोबतच प्रल्हाद पाटील यांचा धमाल आॅर्केस्ट्रा हिटस् बीटस् गाण्याचा कार्यक्रमही सखींसाठी होणार आहे.

‘कलर्स’ चॅनेलवर पुन्हा एकदा ३० जुलै २०१६ पासून शनिवारी रात्री १० वाजता ‘झलक दिखला जा हॉट है’ सुरू होणार आहे. यावेळचे मुख्य आकर्षण म्हणजे २००६ ची ‘मिस युनिव्हर्स श्रीलंका’ आणि सुप्रसिद्ध मॉडेल जॅकलीन फर्नांडिस सेलिब्रिटी जज आहे. याशिवाय सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक करण जोहर, सुप्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश हेगडे हेसुद्धा परीक्षकांच्या भूमिकेत धमाल करणार आहेत. एकूण बारा सेलिब्रिटी या ‘झलक दिखला जा हॉट है’ यामध्ये सहभागी होणार आहेत. यात सुर्वीन चावला, करिश्मा तन्ना, शक्ती अरोरा, अर्जुन बिजलानी, गौरव गेरा (चुटकी फेम), पूनम शहा, प्रियंका शहा (जुळ्या बहिणी), हरपालसिंग शोखी (शेफ), हेली शाह, नोरा फतेही, सलमान युसूफ खान आणि शांतनू महेश्वरी असे १० नामवंत प्रख्यात सेलिब्रिटी या शोचे आकर्षण आहे; पण जॅकलीन फर्नांडिसच्या सहभागाने या शोला एक ग्लॅमरस आणि सीझनिंग स्वरूप आले आहे, जे या शोचे वैशिष्ट्य आहे. तेव्हा पावसाच्या गाण्यांसोबत, कर्णमधुर संगीतासोबत, नृत्याच्या दिलखुलास ठेक्यासोबत ‘झलक दिखला जा’चे स्वागत करूया. या कार्यक्रमाचा वेगळा रंग आम्ही घेऊन येत आहोत, ज्यात असणार आहे डान्स, मस्ती, मनोरंजन आणि धमाल.

Web Title: 'Colors' presented 'Sakhi Forum Rimzim Songs Thakla Suhani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.