OBC Reservation  : छगन भुजबळ, फडणवीसांशी खुल्या चर्चेला तुम्ही बिंदू चौकात या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 12:46 PM2021-06-26T12:46:17+5:302021-06-26T12:52:08+5:30

Bjp OBC Reservation Kolhapur : छगन भुजबळ यांनी पुड्या न सोडता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी खुली चर्चा करण्यासाठी कोल्हापूरच्या बिंदू चौकात यावे असे जाहीर आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.

Come to Bindu Chowk for open discussion with Bhujbal and Fadnavis | OBC Reservation  : छगन भुजबळ, फडणवीसांशी खुल्या चर्चेला तुम्ही बिंदू चौकात या

OBC Reservation  : छगन भुजबळ, फडणवीसांशी खुल्या चर्चेला तुम्ही बिंदू चौकात या

googlenewsNext
ठळक मुद्देभुजबळ, फडणवीसांशी खुल्या चर्चेला बिंदू चौकात या चंद्रकांत पाटील यांचे ओबीसी आरक्षणाबाबत आव्हान

कोल्हापूर  : छगन भुजबळ यांनी पुड्या न सोडता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी खुली चर्चा करण्यासाठी कोल्हापूरच्या बिंदू चौकात यावे असे जाहीर आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.

ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेर्धात भाजपच्या ओबीसी मोर्चाच्यावतीने येथील दाभोळकर कॉनर्रला चक्का जाम करण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी हे आव्हान दिले.

पाटील म्हणाले, ५० टक्क्यावर आरक्षण गेल्यानंतरही फडणवीस सरकारने हे आरक्षण टिकवलं होतं. त्यानंतर आमचं सरकार गेलं. सर्वोच्च न्यायालयानं १५ वेळा सांगूनही डाटा उपलब्ध करून दिला नाही. प्रत्येक वेळी तारीख मागत राहिलात. तुम्ही त्याचं कायद्यात रूपांतर केलं नाही. मराठा समाजाचा घात तुम्ही केलात, ओबीसी समाजाचा घात तुम्ही केलात. तेव्हा बिंदू चौकात या. नेमकी कुणी फसवणूक केली ते कळूद्या.

माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ओबीसी समाजाने आता कॉंग्रेसला जाब विचारला पाहिजे. कारण ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्याविरोधात का कॉग्रेसच्या आमदाराच्या मुलाने आणि एका कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्षाने याचिका दाखल केली होती. म्हणून हा घोळ झाला.

यावेळी सुमारे तासभर या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली. अखेर पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेवून सोडून देण्यात आले. माजी आमदार अमल महाडिक, राहूल चिकोडे, सत्यजित कदम, विजय जाधव, विजय सुर्यवंशी, सुनील कदम यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Come to Bindu Chowk for open discussion with Bhujbal and Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.