पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:21 AM2021-07-25T04:21:54+5:302021-07-25T04:21:54+5:30
कोल्हापूर : अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी कोल्हापूरकरांनी तसेच जिल्ह्याबाहेरील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा ...
कोल्हापूर : अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी कोल्हापूरकरांनी तसेच जिल्ह्याबाहेरील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
ही मदत करताना जेवणासाठी तयार खाद्यपदार्थ देण्याऐवजी धान्य पुरवठा किंवा स्वयंपाकासाठी आवश्यक साहित्य कोरड्या स्वरुपात पुरवावे, नागरिकांच्या आवश्यकतेप्रमाणे ताजे खाद्यपदार्थ दिले जातील. तसेच दानशुरांनी गावामध्ये थेट मदत न देता अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व आपली जीवनावश्यक साहित्य स्वरुपातील मदत महासैनिक दरबार हॉल, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे पोहोचवावी. (हे स्थळ GPS वर उपलब्ध आहे.) जिल्ह्याबाहेरील इच्छुक दानशूर व्यक्ती, संस्था यांच्यासाठी वाहतुकीकरिता उपलब्ध मार्गाची माहिती कोल्हापूर पोलीस दलाच्या www.kolhapurpolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
---
यांच्याशी साधा संपर्क
अन्नपदार्थ : अमोल थोरात (खनिकर्म अधिकारी) ९८८१९१५०८८, सुधाकर गावित - ८४०८९५९७९९)
जीवनावश्यक साहित्य (धान्य, भांडी, कपडे, इतर) : श्रावण क्षीरसागर (उपजिल्हाधिकारी महसूल - ९१३०९००९००, ८५०७११०१११, आकाशदीप राठोड - ७०८३५६८४८७, वाय. एम. पवार (अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क - ८०८७२७१२७३, ९४२३९२४२६७, रुपेश जाधव ७४९९९३४२४७ यांच्याशी संपर्क साधावा.
---
धनादेश या खात्यावर पाठवावा.
काेल्हापूर डिझास्टर रिफील फंड
खाते क्र. : ०९०११०११००१८७३०
बँक ऑफ इंडिया, शाहुपूरी शाखा
आयएफसी कोड - BKID 0000901
----