आओ भाषा सीखें...’ छत्रपती शहाजी कॉलेजमध्ये अभिनव उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 02:33 PM2018-11-20T14:33:06+5:302018-11-20T15:12:32+5:30
मराठी भाषेमध्ये सर्रासपणे इंग्रजी, हिंदी शब्दांचा वापर भरमसाट होत असल्याने, अनेक शब्दांना संबंधित भाषेत काय म्हणतात, असे प्रश्न अनेक वेळा सर्वांनाच पडतात. हीच खंत लक्षात घेऊन छत्रपती शहाजी महाविद्यालयात ‘आओ भाषा सीखें...’ या उपक्रम राबविला जात आहे.
-प्रदीप शिंदे
कोल्हापूर : मराठी भाषेमध्ये सर्रासपणे इंग्रजी, हिंदी शब्दांचा वापर भरमसाट होत असल्याने, अनेक शब्दांना संबंधित भाषेत काय म्हणतात, असे प्रश्न अनेक वेळा सर्वांनाच पडतात. हीच खंत लक्षात घेऊन छत्रपती शहाजी महाविद्यालयात ‘आओ भाषा सीखें...’ या उपक्रम राबविला जात आहे. मातृभाषेवर प्रभुत्व असलेच पाहिजे, यात दुमत नाही; परंतु जगातील व्यवहाराची प्रमुख भाषा इंग्रजीसह हिंदी भाषाही येणे गरजेचे आहे. ज्ञानाच्या क्षेत्रात आज झपाट्याने बदल घडून येत आहेत.
मराठी भाषेसोबतच आता हिंदी व इंग्रजी भाषा बोलली जाते. मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलण्यासह त्यांचे व्याकरणही चांगले पाहिजे. हीच गोष्ट लक्षात घेऊन छत्रपती शहाजी महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख प्रा. अरुण कांबळे यांनी प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांच्यासह पुढाकार घेऊन महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी आणि प्राध्यापकांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांना अधिक बळकटी करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. ‘आओ भाषा सीखें...’ हा उपक्रम गेल्या दीड वर्षापासून महाविद्यालयात राबविला जात आहे. त्यामुळे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांतील शब्द, म्हणींची ओळख होऊन त्यांच्या व्यवहारज्ञानात व शब्दांत वाढ झाली आहे.
एक शब्द तीन भाषांतमहाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच ‘आओ भाषा सीखें...’ हा फलक लिहला जातो. दररोज एक शब्द मराठी, हिंदी आणि इंग्रजी तीन भाषांमध्ये लिहिला जातो. वेगवेगळ्या म्हणी, वाक्प्रचार व ग्रामीण बोलीभाषेतील शब्द येथील फलकावर लिहिला जात असल्याने विद्यार्थ्यांसह प्राध्यापक व कर्मचाºयांच्या शब्दज्ञानात वाढ होत आहे.
मला वेगवेगळ्या भाषांमधील शब्द वाचणे व त्यांचा नेमका अर्थ लावण्याचा प्रयत्न करण्याची सवय आहे. त्यातूनच या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आम्ही सुरू केला. बोलीभाषेतील शेकडो शब्दांचे अर्थ आजच्या तरुण पिढीला कळावेत, शब्दज्ञान वाढावे हा त्यामागील प्रामाणिक हेतू आहे.
- प्रा. अरुण कांबळे