येणेचवंडीत जी. आर. पाटील यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:18 AM2021-07-16T04:18:06+5:302021-07-16T04:18:06+5:30

येणेचवंडीत जी. आर. पाटील यांचा सत्कार नूल : येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथे ग्रामपंचायतीतर्फे कोरोना काळात रुग्णांना उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल ...

Coming to G. R. Patil felicitated | येणेचवंडीत जी. आर. पाटील यांचा सत्कार

येणेचवंडीत जी. आर. पाटील यांचा सत्कार

Next

येणेचवंडीत जी. आर. पाटील यांचा सत्कार

नूल : येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथे ग्रामपंचायतीतर्फे कोरोना काळात रुग्णांना उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल डॉ. जी. आर. पाटील (निट्टूर, ता. चंदगड) यांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच भारत झळके होते.

उपसरपंच तानाजी कुराडे, संजय बिरंजे, शंकर कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराबद्दल पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त करून गोरगरिबांना मास्कचे वाटप केले.

यावेळी शिवाजी कुराडे, भैरू बिरंजे, दत्ता कांबळे, दत्तात्रय लोंढे, संजय शिंदे, ताराबाई कुराडे, रेणुका बिरंजे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

अमित नंद्यान्नावर यांनी स्वागत केले. अविनाश कुराडे यांनी आभार मानले

फोटो ओळी :

येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथे डॉ. जी. आर. पाटील यांचा सत्कार सरपंच भारत झळके यांनी केला. यावेळी तानाजी कुराडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

क्रमांक : १५०७२०२१-गड-०१

Web Title: Coming to G. R. Patil felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.