कर्नाटकात दहावी परीक्षेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:17 AM2021-07-20T04:17:55+5:302021-07-20T04:17:55+5:30
तथापि, नेहमीप्रमाणे ही परीक्षा लेखी स्वरूपात असली तरी प्रश्नपत्रिका ही स्पर्धात्मक परीक्षेप्रमाणे सीएमआर शिटप्रमाणे आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी ...
तथापि, नेहमीप्रमाणे ही परीक्षा लेखी स्वरूपात असली तरी प्रश्नपत्रिका ही स्पर्धात्मक परीक्षेप्रमाणे सीएमआर शिटप्रमाणे आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी संबंधित प्रश्नाचे उत्तर हे केवळ पर्यायापैकी निवडून उत्तर निश्चित करावयाचे आहे. उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे फोटो असणारे आहेत.
सोमवार (१९) रोजी गणित, समाजशास्त्र, विज्ञान तर गुरुवार (२२) रोजी मराठी, इंग्रजी व कन्नड हे पेपर होणार आहेत. ४० गुणांच्या या प्रश्नपत्रिकेसाठी ३ तास वेळ देण्यात आला आहे. तसेच परीक्षा केंद्रात फळ्याच्या विरुद्ध दिशेला बेंच लावून बैठक व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये ५ फुटाचे अंतर ठेवण्यात आले आहे.
चिक्कोडी विभागीय शिक्षण क्षेत्रात २२१ केंद्रावर ४५ हजार विद्यार्थ्यांची नोंद असून संकेश्वर शहरात एस. डी. हायस्कूल ४२४, कन्या शाळा ३२३, मगदूम हायस्कूल २२३ असे एकूण ९७० विद्यार्थी परीक्षा देत आहेत.