नेसरी येथे कोरोना तपासणी केंद्राची सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:10 AM2021-05-04T04:10:50+5:302021-05-04T04:10:50+5:30
या तपासणीसाठी यापूर्वी गडहिंग्लज अथवा चंदगड येथे जावे लागत होते; पण आता ही सोय आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यांतील ...
या तपासणीसाठी यापूर्वी गडहिंग्लज अथवा चंदगड येथे जावे लागत होते; पण आता ही सोय आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यांतील मध्यवर्ती केंद्र असलेल्या नेसरी येथे झाल्याने नेसरीसह आजूबाजूच्या सुमारे तीस ते चाळीस खेड्यांतील ग्रामीण जनतेचा वेळ, बसणारा आर्थिक भुर्दंड वाचणार असून, त्यांच्यावरील संभाव्य रुग्णावर ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.
यावेळी समुपदेशक कपिल मुळे, फार्मासिस्ट आशीष कल्याणकर, परिचारिका ऊर्जादेवी पाटील, कोमल देसाई, सुरेखा पोवार, रेश्मा हुले व इम्तियाज सय्यद उपस्थित होते. दिवसभरात अनेक नागरिकांनी या केंद्राचा लाभ घेतला.
--------------
फोटो ओळी
नेसरी : ग्रामीण रुग्णालयात कोविड तपासणीप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल वसकल्ले, डॉ. प्रशांत चौगुले, डॉ. सत्यजित देसाई, विक्रम गंधाडे, ऊर्जादेवी पाटील, आदी उपस्थित होते.