लिंगनूरमध्ये कोरोना लसीकरणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:18 AM2021-06-05T04:18:19+5:302021-06-05T04:18:19+5:30

लिंगनूर, बेकनाळ, जखेवाडीसह परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र कडगाव येथे लसीकरणासाठी जावे लागत होते. मात्र, केंद्रावर होणारी गर्दी व ...

Commencement of corona vaccination in Lingnur | लिंगनूरमध्ये कोरोना लसीकरणास प्रारंभ

लिंगनूरमध्ये कोरोना लसीकरणास प्रारंभ

Next

लिंगनूर, बेकनाळ, जखेवाडीसह परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र कडगाव येथे लसीकरणासाठी जावे लागत होते. मात्र, केंद्रावर होणारी गर्दी व संभाव्य कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष प्रयत्न करून गावपातळीवरच लस उपलब्ध केल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.

आरोग्यसेविका मेघा देवार्डे, अभिजित कातकर व गावित, आशा सेविका संगीता येसरे, सुनीता जोशिलकर व कविता येसरे, अंगणवाडी सेविका गीता खांडेकर, सोनाबाई कुरळे, रमा पाटील व मदतनीस आनंदी चोथे यांचा कोरोना योद्धा म्हणून उपसरपंच दीपक राजगोळे, तात्यासाहेब पाटील, मनीषा ढेंगे यांच्या हस्ते सत्कार झाला.

या वेळी ग्रामसेवक बाबासाहेब पाटील, तलाठी जितेंद्र माने, मारुती संकपाळ, राजशेखर पाटील, विजयकुमार भुरगुडा, बाळू मुल्लाणी आदी उपस्थित होते.

-------------------------

कोरोना थोपविण्यात यश

गावातील नागरिकांचा दैनंदिन व अन्य कामानिमित्त गडहिंग्लज शहराशी संपर्क येतो. मात्र, गडहिंग्लज शहराच्या अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या अन्य गावात सद्य:स्थितीला कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. मात्र, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व नागरिकांच्या सतर्कतेमुळेच गावात सध्या एकच रुग्ण असून कोरोनाला थोपविण्यात गावाने यश मिळविले आहे.

--------------------------

फोटो ओळी : लिंगनूर कानूल (ता. गडहिंग्लज) येथे सरपंच परमेश्वरी पाटील यांनी आरोग्यसेविका मेघा देवार्डे यांचा सत्कार केला. या वेळी तात्यासाहेब पाटील, बाबासाहेब पाटील, राजशेखर पाटील आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०४०६२०२१-गड-०१

Web Title: Commencement of corona vaccination in Lingnur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.