इचलकरंजीत पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा योजनेच्या कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:38 AM2020-12-13T04:38:01+5:302020-12-13T04:38:01+5:30
सर्वसामान्यांची आर्थिक बचत करणारी आणि पर्यावरणाची हानी टाळणारी ही महत्त्वाकांक्षी योजना निश्चित वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन माजी आमदार सुरेश ...
सर्वसामान्यांची आर्थिक बचत करणारी आणि पर्यावरणाची हानी टाळणारी ही महत्त्वाकांक्षी योजना निश्चित वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले; तर आमदार प्रकाश आवाडे यांनी गॅस कंपनीने पाईपलाईन टाकताना केलेली रस्ताखुदाई कामासोबतच बुजवून पूर्ववत रस्ता करण्याचेही नियम पाळावेत अन्यथा पुढे खुदाई करू देणार नाही, असा इशारा दिला. सुरक्षिततेचा विचार करूनच सर्वांना स्वयंपूर्ण करण्यासाठी पाण्याप्रमाणे आता पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा केला जात आहे. या योजनेतून पहिल्या टप्प्यात १५ हजार मालमत्ताधारकांना गॅस पुरवठा केला जाणार असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले. कार्यक्रमास माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, सुनील पाटील, अनिल डाळ्या, रवींद्र माने यांच्यासह कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.