कर्मवीर मल्टिस्टेट संस्थेच्या हेरले विस्तारित कक्षाचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:42 AM2021-02-18T04:42:56+5:302021-02-18T04:42:56+5:30
यावेळी बोलताना अध्यक्ष अनिल भोकरे म्हणाले, संस्थेकडे ४७० कोटी ठेवी व ३०० कोटींची कर्जे असून, घरबांधणी, नवीन वाहन खरेदी, ...
यावेळी बोलताना अध्यक्ष अनिल भोकरे म्हणाले, संस्थेकडे ४७० कोटी ठेवी व ३०० कोटींची कर्जे असून, घरबांधणी, नवीन वाहन खरेदी, सोनेतारण कर्जासाठी १० टक्के व्याजदराने तसेच सुवर्ण आभूषण खरेदीसाठी ९ टक्के व्याज दाराने संस्थेने कर्ज योजना आणली असून, हेरले गावातील सभासद व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा.
यावेळी संचालक आदिनाथ किनिंगे, संचालक भूपाल गिरमल, जवाहर साखर कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील, पंचायत समिती सदस्य मुनीर जमादार, उपसरपंच राहुल शेटे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शेतकरी सेवा संस्थेचे अध्यक्ष देवगोंडा पाटील, ए. बी. चौगुले, प्रा. राजगोंडा पाटील संस्थेचे संचालक भरत गाट, सुकुमार पाटील, वि. दा. आवटी, रमेश पाटील, कुमार पाटील, राजेंद्र नांदणे, रावसाहेब मलिकवाडे, सल्लागार पी. ए. पाटील उपस्थित होते.
फोटो:- कर्मवीर मल्टिस्टेट संस्थेच्या हेरले येथे विस्तारित कक्षाच्या प्रारंभप्रसंगी अध्यक्ष अनिल भोकरे, व्हा. चेअरमन रावसाहेब पाटील व संचालक मंडळ उपस्थित होते.