शिवाजी विद्यापीठात मियावाकी जंगल लागवडीचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:18 AM2021-06-21T04:18:01+5:302021-06-21T04:18:01+5:30

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाच्या शेजारील परिसरामध्ये मियावाकी जंगल (दाट वनराई) लागवडीस शनिवारी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के ...

Commencement of Miyawaki forest cultivation at Shivaji University | शिवाजी विद्यापीठात मियावाकी जंगल लागवडीचा प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात मियावाकी जंगल लागवडीचा प्रारंभ

Next

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाच्या शेजारील परिसरामध्ये मियावाकी जंगल (दाट वनराई) लागवडीस शनिवारी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते जांभूळ रोप लावून प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते बहावा आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते कांचन रोपे लावण्यात आली.

क्रीडा संकुल परिसरातील साडेसात गुंठ्यांच्या परिसरात बहावा, कांचन, जांभूळ, चिंच, विलायती चिंच, फणस, जास्वंद, अडुळसा, रातराणी, तगर, चाफा, धावडा आणि बांबू अशा तेरा प्रजातींच्या एकूण ९५८ रोपांची लागवड करण्यात आली. ही सर्व रोपे शिवाजी विद्यापीठाच्या रोपवाटिकेत तयार करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे अशा प्रकारे विद्यापीठाच्या परिसरात दहा विविध ठिकाणी मियावाकी जंगलांची निर्मिती करण्याचा मानस आहे, अशी माहिती उद्यान विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी दिली. मियावाकी जंगल ही दाट वृक्षारोपणाची मूळ जपानी संकल्पना असून त्याअंतर्गत विविध प्रकारच्या प्रजातींची गर्द, दाट वनराई होईल, अशा प्रकारे लागवड करण्यात येते. त्यामुळे या परिसरात वनस्पतींच्या वैविध्यतेबरोबरच जैवविविधतेचाही मोठ्या प्रमाणात विकास होतो. विविध प्रकारचे पशु-पक्षी या वनराईच्या आश्रयास राहावयास येत असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया

जलसंवर्धनाच्या कामासह आता शिवाजी विद्यापीठाने गर्द वनराईची निर्मिती हाती घेऊन जैवविविधता विकासाच्या दृष्टीने या मियावाकी जंगल लागवडीच्या माध्यमातून एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

-डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू

फोटो (२००६२०२१-कोल-मियावाकी वन) : शिवाजी विद्यापीठातील क्रीडा संकुल परिसरातील साडेसात गुंठ्यांच्या परिसरात मियावाकी जंगल लागवड करण्याचे काम उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे.

===Photopath===

200621\20kol_5_20062021_5.jpg

===Caption===

फोटो (२००६२०२१-कोल-मियावाकी वन) : शिवाजी विद्यापीठातील  क्रीडा संकुल परिसरातील साडेसात गुंठ्यांच्या परिसरात मियावाकी जंगल लागवड करण्याचे काम उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे.

Web Title: Commencement of Miyawaki forest cultivation at Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.