कोकणात सागरी कासवांच्या विणीच्या हंगामाला प्रारंभ; गुहागरच्या किनाऱ्यावर मिळाले पहिले घरटे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 02:04 PM2024-11-21T14:04:10+5:302024-11-21T14:05:32+5:30

संदीप आडनाईक  कोल्हापूर : सागरी कासवांच्या विणीचा हंगामातील पहिले घरटे कोकण किनारपट्टीवर गुहागर किनाऱ्यावर मिळाले आहे. वन विभागाच्या नोंदीनुसार ...

Commencement of sea turtle nesting season in Konkan The first nest was found on the shore of Guhagar | कोकणात सागरी कासवांच्या विणीच्या हंगामाला प्रारंभ; गुहागरच्या किनाऱ्यावर मिळाले पहिले घरटे

कोकणात सागरी कासवांच्या विणीच्या हंगामाला प्रारंभ; गुहागरच्या किनाऱ्यावर मिळाले पहिले घरटे

संदीप आडनाईक 

कोल्हापूर : सागरी कासवांच्या विणीचा हंगामातील पहिले घरटे कोकण किनारपट्टीवर गुहागर किनाऱ्यावर मिळाले आहे. वन विभागाच्या नोंदीनुसार रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी १५ किनाऱ्यांवर कासवांची घरटी सापडतात.

हिवाळ्याच्या तोंडावर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमध्ये दरवर्षी सागरी कासवांची वीण होते. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. या कालावधीत समुद्री कासवांमधील 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किनाऱ्यांवर ग्रीन सी कासवांची घरटी देखील सापडली आहेत. यंदापासून कासव संवर्धनाच्या कामाच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी कांदळवन कक्षाच्या खांद्यावर असणार आहे.

सागरी कासवांच्या विणीसाठी प्रसिद्ध असलेल्या गुहागरच्या किनाऱ्यावर राज्यातील सागरी कासवांची सर्वात जास्त घरटी आढळतात. सहा किलोमीटर लांबीच्या या किनाऱ्यावर गेल्यावर्षी २९८ घरटी आढळून आली होती. यंदाच्या हंगामातील पहिले घरटे शुक्रवारी सकाळी गुहागरच्या किनाऱ्यावर आढळल्याची माहिती रत्नागिरीच्या विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई यांनी दिली. यामध्ये आढळलेल्या ११७ अंड्यांना कासवमित्रांनी हॅचरीमध्ये सुरक्षित हलविल्याचे त्यांनी सांगितले.

तीन हॅचरीमधून कासव संवर्धन

गुहागर किनाऱ्यावर सहा कासवमित्रांच्या मदतीने कासव संवर्धनाचे काम होते. यासाठी दोन हॅचरी तयार करण्यात येतात. मात्र, गुहागर किनाऱ्यावर कासवांची घरटी सापडण्याची वर्षागणिक वाढणारी संख्या लक्षात घेता, तीन हॅचरी बांधून कासव संवर्धनाचे काम करणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी कोकण किनारपट्टीवरून समुद्री कासवांची १ लाख ५८ हजार ८७३ पिल्ले समुद्रात सोडली होती. तीन सागरी जिल्ह्यांमध्ये कासवांची २ हजार ५६६ घरटी आढळली होती आणि पिल्लांच्या जन्म होण्याचा दर ६४ टक्के होता. हा दर यंदाही कायम आहे.

Web Title: Commencement of sea turtle nesting season in Konkan The first nest was found on the shore of Guhagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.