रस्त्याच्या नियोजनबद्ध विकासास सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:18 AM2021-06-05T04:18:13+5:302021-06-05T04:18:13+5:30

कळंबा : उपनगरातील क्रेशेर चौक ते संभाजीनगर तसेच देवकर पाणंद ते साळोखेनगर रस्ता अमृत योजनेअंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी उकरण्यात आला ...

Commencement of planned development of the road | रस्त्याच्या नियोजनबद्ध विकासास सुरवात

रस्त्याच्या नियोजनबद्ध विकासास सुरवात

Next

कळंबा : उपनगरातील क्रेशेर चौक ते संभाजीनगर तसेच देवकर पाणंद ते साळोखेनगर रस्ता अमृत योजनेअंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी उकरण्यात आला होता. पाईपलाईन टाकल्यानंतर खुदाईतील मुरमाने रस्ता कसाही मुजवल्याने वाहनधारकाना मोठी कसरत करावी लागत होती याबाबतचे सविस्तर वृत्त शुक्रवारच्या लोकमतच्या अंकात ‘रस्ते खुदाईच्या नियोजनाचा फज्जा’, ‘वाहनधारकाची कसरत चांगले रस्ते खोदून मुरमाने डागडुजी केल्याचा दिखावा’ शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले आणि संबंधित ठेकेदारासह प्रशासन हडबडून जागे झाले.

जलवाहिनी टाकल्यानंतर निव्वळ मुरमात मुजवलेल्या रस्त्याची शुक्रवारी सकाळी पुन्हा जेसीबीच्या साहाय्याने एक फुटाने खुदाई करण्यात आली. त्यावर साठ एमएम खडी पसरण्यात आली. पुन्हा नव्याने मुरूमाचा थर पसरत पाणी टाकून रोलिंग करण्यात आले. संबंधित ठेकेदाराने यावर लवकरच चाळीस एमएम खडी पसरून पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले.

वास्तविक राधानगरी आणि गारगोटी रस्त्यांना जोडणारा वाहनधारकांच्या वर्दळीचा हा रस्ता परंतु जलवाहिन्या टाकण्यासाठी अक्षरशः रस्त्याची चाळण करण्यात आली होती. वाहनधारक सोडा, पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून ये- जा करणे अवघड बनले होते. ठेकेदाराच्या मुरमाचा मुलामा देऊन करण्यात आलेल्या निकृष्ट रस्त्याबाबतीत लोकमतमधून सविस्तर बातमी प्रसिद्ध होताच यंत्रणा कामाला लागली हे विशेष.

एकंदरीत रस्ते खुदाई व डांबरीकरण कामे दर्जेदार करण्याच्या कामावर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष का होते, केल्या जाणाऱ्या कामाची पाहणी पालिकेच्या संबंधित प्रशासनाकडून का होत नाही, हे अनुत्तरित प्रश्न प्रत्येकवेळी प्रसारमाध्यमांतून पंचनामा होताच प्रशासन सुस्त कसे, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

फोटो मेल केला आहे

फोटो ओळ.... क्रेशेर चौक ते संभाजीनगरपर्यंत खुदाईनंतर निव्वळ मुरमात मुजवलेल्या रस्त्याच्या डांबरीकरण करण्यासाठीच्या कामास लोकमतमधून बातमी प्रसिद्ध होताच पुन्हा सुरवात करण्यात आली.

Web Title: Commencement of planned development of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.