सरुड परिसरात ऊसभरणीच्या कामांना प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:21 AM2021-04-19T04:21:36+5:302021-04-19T04:21:36+5:30
सरुड परिसरातील सरुडसह शिंपे पाटणे, सौते शिरगाव, वडगाव चरण, थेरगाव, वाडीचरण, आदी वारणा व कडवी नदीकाठांवरील गावांतील शेतकऱ्यांनी इतर ...
सरुड परिसरातील सरुडसह शिंपे पाटणे, सौते शिरगाव, वडगाव चरण, थेरगाव, वाडीचरण, आदी वारणा व कडवी नदीकाठांवरील गावांतील शेतकऱ्यांनी इतर पिकांपेक्षा ऊसपिकाच्या लागवडीस प्राधान्य दिल्याने या वर्षी सरुड परिसरामध्ये ऊसपिकाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या या परिसरात ऊसभरणीच्या कामांना गती आली असून, ही कामे उरकून घेण्यात शेतकरी वर्ग मग्न आहे. पूर्वी बैलजोडीच्या साहाय्याने ऊसभरणी केली जात होती; परंतु आता बैलजोडीसह लहान पॉवर टिलर ट्रॅक्टरच्या साहाय्यानेही आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ऊसभरणी केली जात आहे. ऊस भरणीपूर्वी पिकास खतांचा डोस दिल्यास तो ऊसपिकाच्या वाढीसाठी पोषक ठरत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांकडून ऊसपिकास खतांचा डोस देऊनच ऊसभरणी केली जात आहे.