मोबाईल मेडिकल युनिटच्या कामास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:17 AM2021-06-11T04:17:28+5:302021-06-11T04:17:28+5:30
कोल्हापूर- राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला मिळालेल्या मोबाईल मेडिकल युनिटचे उद्घाटन ...
कोल्हापूर- राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला मिळालेल्या मोबाईल मेडिकल युनिटचे उद्घाटन गुरूवारी अध्यक्ष बजरंग पाटील आणि आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
चाळीस लाख रूपयांचे हे युनिट चंदगड, आजरा आणि भुदरगड तालुक्यातील ५४ दुर्गम आणि डोंगराळ गावांना आरोग्यविषयक सेवा देणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे किंवा उपकेंद्रापर्यंत येण्यापेक्षा या मोबाईल मेडिकल युनिटच्या माध्यमातून वाड्या वस्त्यांना आरोग्य सेवा मिळण्यास आता सुरूवात होणार आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जि. प. सदस्य राजवर्धन निंबाळकर, प्रकाश टोणपे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. फारूक देसाई, डॉ. हर्षला वेदक डॉ. आशा कुडचे, डॉ. स्मिता खंडारे, डॉ. संजीवनी बेलेकर उपस्थित होत्या.
१००६२०२१ कोल झेडपी ०१
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंर्तगत मिळालेल्या मोबाईल मेडिकल युनिटचे उद्घाटन गुरूवारी अध्यक्ष बजरंग पाटील व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डावीकडून डॉ. स्मिता खंडारे, डाॅ. आशा कुडचे, डॉ. फारूक देसाई, राजवर्धन निंबाळकर, संजयसिंह चव्हाण, प्रकाश टोणपे, डॉ. उषादेवी कुंभार, डॉ. हर्षला वेदक उपस्थित होत्या.