वाणिज्य : ‘ॲस्टर’चा मोफत सिटी स्कॅन उपक्रम दिलासादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:45 AM2021-02-06T04:45:34+5:302021-02-06T04:45:34+5:30

कोल्हापूर : ॲस्टर आधार हॉस्पिटलच्यावतीने सुरू केलेला ‘ॲस्टर फ्री इन’ हा उपक्रम गोरगरीब रुग्णांना दिलासादायक आहे, असे गौरवोद्गार ग्रामविकास ...

Commerce: Aster's free CT scan initiative is heartening | वाणिज्य : ‘ॲस्टर’चा मोफत सिटी स्कॅन उपक्रम दिलासादायक

वाणिज्य : ‘ॲस्टर’चा मोफत सिटी स्कॅन उपक्रम दिलासादायक

Next

कोल्हापूर : ॲस्टर आधार हॉस्पिटलच्यावतीने सुरू केलेला ‘ॲस्टर फ्री इन’ हा उपक्रम गोरगरीब रुग्णांना दिलासादायक आहे, असे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी येथे काढले. ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या ‘ॲस्टर फ्री इन’ या उपक्रमाचा लोकार्पण मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. या उपक्रमांतर्गत येत्या वर्षभरात एक हजार गरीब रुग्णांचे सिटी स्कॅनची तपासणी मोफत केली जाणार आहे.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ॲस्टर आधार ही देशातीलच नव्हे तर जगातील गुणवत्त व दर्जेदार वैद्यकीय व्यवस्था आहे. समाजातील गोरगरीब व गरजू रुग्णांचे योग्य निदान व उपचार करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. ॲस्टर डीएम हेल्थकेअरचे चेअरमन व एम.डी. डॉ. आझाद मोपेन यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधीलकीतून पुढे आलेला हा लोकोपयोगी उपक्रम आहे.

हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. उल्हास दामले म्हणाले, दुबईमध्ये मुख्यालय असणाऱ्या या संस्थेचे जगभरात ३५६ ठिकाणी हॉस्पिटल, क्लिनिक, फार्मसी आहेत. ज्या ७ वेगवेगळ्या देशांमध्ये पसरलेल्या आहेत. भारतात असणाऱ्या १४ हॉस्पिटलपैकी कोल्हापूरमधील ॲस्टर आधार एक हॉस्पिटल आहे.

ॲस्टरचे डी एम हेल्थकेयरचे चेअरमन, डॉ. आझाद मोपेन यांनी दुबईवरून खास व्हिडिओ संदेश पाठविला होता. यामध्ये ते म्हणाले, समाजाने आम्हाला खूप काही दिले आणि समाजाला गरजेच्या वेळी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, या भावनेतूनच ‘ॲस्टर व्हॉलेंटियर’ सुरू केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद मोटे, डॉ. संजय देशपांडे, डॉ. संतोष सरूडकर, डॉ. अमित माने आदी उपस्थित होते.

फोटो : ०४०२२०२१ कोल ॲस्टर आधार न्यूज १

ओळी : कोल्हापुरात ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या ‘ॲस्टर फ्री इन’ या मोफत सिटी स्कॅन उपक्रमाचा प्रारंभ शुक्रवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Commerce: Aster's free CT scan initiative is heartening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.