(वाणिज्य.. कॉमन पान) बालिंगे सरपंचपदी मयूर जांभळे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:31 AM2021-02-27T04:31:27+5:302021-02-27T04:31:27+5:30
(फोटो-२६०२२०२१-कोल-मयूर जांभळे व पंकज कांबळे) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : बालिंगे (ता. करवीर) येथील सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मयूर मधुकर ...
(फोटो-२६०२२०२१-कोल-मयूर जांभळे व पंकज कांबळे)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : बालिंगे (ता. करवीर) येथील सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मयूर मधुकर जांभळे यांची, तर उपसरपंचपदी पंकज पांडुरंग कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. के. पाटील हाेते. चाळीस वर्षांच्या इतिहासात जांभळे कुटुंबात सरपंच पदाची पहिल्यांदाच संधी मिळाल्याने समर्थकांनी जेसीबीतून गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, नंदकुमार जांभळे, अनिल पवार, श्रीकांत भवड, जनार्दन जांभळे, विश्वास जांभळे, भीमराव कांबळे, अजय भवड, कृष्णा तमाळी, पांडुरंग वाडकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते. सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन बालिंगे विकासाचे मॉडेल बनविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सरपंच मयूर जांभळे यांनी सांगितले.
वडिलांच्या पुण्याईचे मुलग्याला फळ
मयूर जांभळे हे बी.ई (मेकॅनिकल) आहेत. अवघ्या २५व्या वर्षी बिनविरोध सदस्य आणि सरपंच म्हणून संधी मिळाली. त्यांचे वडील मधुकर जांभळे यांच्या तीस वर्षांच्या राजकीय पुण्याईचे फळ त्यांना मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.