(वाणिज्य...) होमिओपॅथी संशोधनाचे कार्य प्रभावीपणे मांडावे - डी. टी. शिर्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:22 AM2021-03-22T04:22:20+5:302021-03-22T04:22:20+5:30
कोल्हापूर : हाेमिओपॅथी संशाेधनाचे कार्य संख्येच्या स्वरूपात अधिक प्रभावीपणे मांडणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. ...
कोल्हापूर : हाेमिओपॅथी संशाेधनाचे कार्य संख्येच्या स्वरूपात अधिक प्रभावीपणे मांडणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज एक्स स्टुडंट्स असोसिएशन (होमेसा)च्या वतीने आयोजित ‘होमेसाकॉन २०२१’ परिषदेत ते बोलत होते.
डॉ. शिर्के म्हणाले, होमिओपॅथस्नी आयुष्यभर नवनवे शिकत राहावे व स्वत:चे वैद्यकीय ज्ञान सतत अद्ययावत ठेवून संशोधनाशी नाते जोडले तर समाज आरोग्यदायी राहील. कोरोनाने मानवाला व्हर्च्युअल, ई-लर्निंग तसेच इंटरॅक्चुअल जगायला शिकवले.
यावेळी महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठ नाशिकचे अधिष्ठाता डॉ. धनाजी बागल, डॉ. पृथ्वीराज मेथे (सांगली), डॉ. संतोष रानडे (कोल्हापूर), प्राचार्य डॉ. रोझारिओ डिसोझा, डॉ. मनीषा शर्मा (मुंबई), डॉ. पायल परमार (मुंबई) यांनी मार्गदर्शन केले. ‘होमेसा’चे प्रेसिडेंट डॉ. राजकुमार पाटील यांनी स्वागत केले. संयोजन सचिव डॉ. सुनेत्रा शिराळे यांनी ‘कोरोना - काहीही कायमचे टिकत नाही’ या परिषदेच्या संकल्पनेबाबत माहिती दिली. डॉ. राजेश कागले यांनी आभार मानले. परिषद यशस्वी होण्यासाठी डॉ. हिंमतसिंह पाटील, डॉ. सुहास पाटील, डॉ. अन्वर गंजेली, डॉ. हर्षवर्धन जगताप, डॉ. शीतल पाटील, डॉ. सुधीर जरे, आदींनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी : होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज एक्स स्टुडंट्स असोसिएशन (होमेसा) च्या वतीने आयोजित ‘होमेसाकॉन २०२१’ परिषदेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. धनाजी बागल, डॉ. पृथ्वीराज मेथे, आदी उपस्थित होते. (फाेटो-२१०३२०२१-कोल-होमिओपॅथिक)