(वाणिज्य...) कोल्हापूर महिला बँकेस १.६५ कोटीचा नफा -शैलजा सुर्यवंशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:25 AM2021-04-08T04:25:31+5:302021-04-08T04:25:31+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महिला सहकारी बँकेस २०२०-२१ अहवाल सालात १ कोटी ६५ लाख रुपये नफा झाल्याची माहिती बँकेच्या अध्यक्षा ...
कोल्हापूर : कोल्हापूर महिला सहकारी बँकेस २०२०-२१ अहवाल सालात १ कोटी ६५ लाख रुपये नफा झाल्याची माहिती बँकेच्या अध्यक्षा शैलजा सूर्यवंशी यांनी पत्रकातून दिली. बँकेचे १४ कोटी भाग भांडवल, ९७ कोटी ठेवी, ५४ कोटींची कर्जे तर ५२ कोटींची गुंतवणूक आहे. बँकेची भांडवल पर्याप्तता १६.०२ टक्के असून निव्वळ एनपीए १.६२ टक्के आहे. बँकेकडे गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्जे, आदी माफक व्याजदरात कर्ज योजना आहेत. बँक ज्येष्ठ नागरिकांना पाव टक्का जादा व्याज देत आहे. बिंदू चौक, हळदी, राजारामपुरी, गांधीनगर, हुपरी, खासबाग व शाहूपुरी या ठिकाणी शाखा आहेत. कोअर बँकिंग सेवा, स्वमालकीच्या डाटा सेंटरची उभारणी केली आहे. एटीएम, मोबाईल बँकिंग, पॉज, आयएमपीएस, ई-कॉमर्स, आदी डिजिटल बँकिंग सेवा सुरू असल्याचे अध्यक्षा सूर्यवंशी यांनी पत्रकात म्हटले आहे.