वाणिज्य वृत्त : मोफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:41 AM2021-02-06T04:41:35+5:302021-02-06T04:41:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जागतिक कॅन्सर दिनानिमित्त मॉडर्न होमिओपॅथीतर्फे मोफत सल्ला आणि मार्गदर्शन शिबिर भरविले आहे. गुरुवारपासून सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जागतिक कॅन्सर दिनानिमित्त मॉडर्न होमिओपॅथीतर्फे मोफत सल्ला आणि मार्गदर्शन शिबिर भरविले आहे. गुरुवारपासून सुरू झालेले हे शिबिर बुधवार (दि.१० फेब्रुवारी)पर्यंत सुरू राहणार आहे.
आजार कोणताही असो, त्यावर संशोधनाद्वारे प्रभावी उपचार देण्याचे योगदान मॉडर्न होमिओपॅथी गेली २५ वर्षे सातत्याने बजावत आहे. डॉ. विजयकुमार माने यांच्या संशोधनातून आणि प्रदीर्घ अनुभवातून कॅन्सरविषयीची सतर्कता, जागरूकता आणि त्यावरील प्रभावशाली उपचार केले जात आहेत. शरीरातील कोणत्याही भागातील गाठ, तोंडातील बरी न होणारी जखम, खोकला, सतत घसा दुखणे, अन्न गिळताना त्रास, शरीरातील कोणत्याही भागातून होणारा रक्तस्राव, वजनात अचानक घट ही कॅन्सरची लक्षणे आहेत.
मॉडर्न होमिओपॅथीमध्ये आजाराच्या मुळावर काम करेल अशी उपचारपद्धती अवलंबली जाते. आमच्या उपचारपद्धतीमध्ये अस्वस्थ रुग्णाला प्रथम स्वस्थता दिली जाते. रुग्णाला होणाऱ्या वेदना मॉर्फीन घेऊनही थांबत नाहीत. आपल्या उपचारपद्धतीमुळे या वेदना १ ते २ महिन्यांतच कमी होऊ शकतात. कॅन्सर होऊन गेलेल्या रुग्णामध्ये आजार पुन्हा उदभवू नये म्हणून प्रतिबंधक औषधे दिली जातात.
केवळ उपचारातील दिरंगाईमुळे परिणाम भोगावे लागतात. ज्ञानाचा अभाव आणि उपचारपद्धती याबद्दलचा संभ्रम दूर करण्यासाठी रुग्णांचे प्रबोधन करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून नजीकच्या मॉडर्न होमिओपॅथीच्या शाखेला भेट देऊन शंका निरसन करावे.