वाणिज्य वृत्त : मॉडर्न होमिओपॅथीकडून स्मार्टफोन, टॅबची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:40 AM2020-12-12T04:40:07+5:302020-12-12T04:40:07+5:30
कोल्हापूर : कोरोनाकाळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना शाबासकी म्हणून मॉडर्न होमिओपॅथीने स्मार्टफोन व टॅब भेट दिले. देशभरात प्रसिद्ध ...
कोल्हापूर : कोरोनाकाळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना शाबासकी म्हणून मॉडर्न होमिओपॅथीने स्मार्टफोन व टॅब भेट दिले. देशभरात प्रसिद्ध असलेली होमिओपॅथी क्लिनिक चेन असलेल्या मॉडर्न होमिओपॅथी कर्मचाऱ्यांप्रती दाखविलेली कृतज्ञता कौतुकास्पद ठरली.
मॉडर्न होमिओपॅथी विशेष करून कॅन्सर, लिव्हर सोरायसिस, किडनी फेल्युअर व इतर गंभीर आजारांवर तसेच सामान्य आजारांवर उपचार करते. डॉ. विजयकुमार माने हे सी.ई.ओ. आहेत. आज मॉडर्न होमिओपॅथी देशातील महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगाना, गुजरातमध्ये सेवा देत असून आगामी काळात मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशसह अन्य राज्यांत सेवा देण्यास लवकर सुरू करणार आहोत, असे डायरेक्टर प्राजक्ता माने यांनी सांगितले. कोल्हापुरातील डॉक्टर विजयकुमार माने यांचे नाव होमिओपॅथी क्षेत्रात देश-विदेशांत अग्रस्थानी राहिले आहे.
मार्चपासून कोरोना संक्रमणाचे जगभर थैमान सुरू असताना येथील सर्व कर्मचारी अविरत सेवा करीत होते. एकाच वेळी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना स्मार्टफोन व टॅब भेट देणारे कोल्हापुरातील हे क्लिनिक ठरले आहे. या वितरण कार्यक्रमाचे स्वागत एच. आर. मॅनेजर मधुकर उलपे यांनी केले. अकौंट मॅनेजर महादेव कोरे यांनी डॉक्टरांचे आभार मानले. जीवक लाईफ सायन्सेसचे टीम लीडर प्राध्यापक संजीव पोफरे यांनी, कर्मचाऱ्यांच्या कामाचे मोल जाणणारे काहीच लोक असतात; त्यांपैकी डॉक्टर विजयकुमार माने आहेत, असे कौतुकोद्गार काढले. सल्लागार प्रदीप सोनार यांनी मॉडर्न होमिओपॅथी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचा मानस व्यक्त केला.
फोटो १११२२०२०-कोल-मॉडर्न न्यूज
फाेटो ओळ : कोरोनाकाळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना शाबासकी म्हणून मॉडर्न होमिओपॅथीने स्मार्टफोन व टॅब भेट दिले.