(वाणिज्य) पंचगंगा बॅंकेला १ कोटी २९ लाखांचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:23 AM2021-01-23T04:23:36+5:302021-01-23T04:23:36+5:30
कोल्हापूर पंचगंगा बॅंकेला १ कोटी २९ लाख रूपये निव्वळ नफा झाल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष राजाराम ...
कोल्हापूर पंचगंगा बॅंकेला १ कोटी २९ लाख रूपये निव्वळ नफा झाल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष राजाराम शिपुगडे यांनी दिली. बॅंकेच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
सामाजिक अंतर राखून आणि कोरोना प्रतिबंधक निकष पाळून ही सभा घेण्यात आली. शिपुगडे म्हणाले, अहवाल वर्षात २६२ कोटींच्या ठेवी झाल्या असून १६२ कोटींचे कर्ज वितरण करण्यात आले. ३ कोटी ९ लाख रूपये कर पूर्व नफा झाला आहे. तर १ कोटी ८० लाख आयकर भरणा करून निव्वळ नफा १ कोटी २९ लाख रूपये मिळाला आहे.
यावेळी रामचंदर मोडक, संजय वाघापूरकर, हेमंत आराध्ये, अंकुश वाघापुरकर, राजेंदर झुरळे, एस. के. कुलकर्णी, पाडळकर, व्हरांबळे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. सुशील कुलकर्णी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचले. मुख्य कार्यकारी अधिकरी दीपक फडणीस यांनी अहवाल वाचन केले. उपाध्यक्ष राहुल भोसले यांनी आभार मानले. यावेळी संचालक पी. एस. कुलकर्णी, विकास परांजपे, भालचंदर साळोखे, दिगंबर जोशी, चंदरशेखर जोशी, उपेंदर सांगवडेकर, संदीप पाटील, नंदकुमार दिवटे, विजय चव्हाण, विवेक शुक्ल, केशव गोवेकर, डॉ. माधुरी कुलकर्णी, वृषाली बंकापुरे उपस्थित होत्या.
२२०१२०२१ कोल पंचगंगा बंक
पंचगंगा बॅंकेच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष राजाराम शिपुगडे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.