वाणिज्य वृत्त : ‘ न हरलेली उदाहरणे’ पुस्तक कॅन्सर रुग्णांसाठी संजीवनी ठरेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:24 AM2021-04-10T04:24:16+5:302021-04-10T04:24:16+5:30
कोल्हापूर: ‘ न हरलेली उदाहरणे’ हे पुस्तक कॅन्सर रुग्णांचा आत्मविश्वास वाढवणारे व संजीवनी देणारे ठरेल, असा विश्वास कोल्हापूर ...
कोल्हापूर: ‘ न हरलेली उदाहरणे’ हे पुस्तक कॅन्सर रुग्णांचा आत्मविश्वास वाढवणारे व संजीवनी देणारे ठरेल, असा विश्वास कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष डॉ. सुरज पवार यांनी व्यक्त केला. भविष्यकाळात पुस्तकांची शृंखला अशीच सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर कॅन्सर सेंटरतर्फे ‘न हरलेली उदाहरणं’ या कॅन्सरवरील विविध रुग्णांचे मनोगत असणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन कॅन्सरवर मात केलेल्या आराध्या चव्हाण या चार वर्षीय चिमुकलीच्या हस्ते झाले. यावेळी कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुरज पवार व एक्झिकेटिव्ह डायरेक्टर डॉ. रेश्मा पवार त्याचबरोबर ऊर्जा क्रिएशनचे डॉ. अरुण नाईक, निर्मितीचे अनंत खासबारदार, शिरीष खांडेकर, कॅन्सर सेंटरचे ट्रस्टी डॉ. संदीप पाटील, डॉ. योगेश अनाप या मान्यवरांची उपस्थिती होती. ’ऊर्जा क्रिएशन’ प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे संकलन व संपादन निर्मितीचे अनंत खासबारदार यांनी केले आहे. यावेळी डॉ. संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना जे कॅन्सर रुग्ण नाहीत पण समाजामध्ये विविध कारणांमुळे मानसिक अपंगत्व असेल, इतर विवंचना असतील यावर विचार केला तर सर्वांच्या आयुष्याला चांगली दिशा या पुस्तकातून मिळेल, अशी आशा व्यक्त केली. निर्मितीचे अनंत खासबारदार यांनी या पुस्तकाची पार्श्वभूमी व उद्देशाची कल्पना देऊन रुग्णांच्या आयुष्यात एक आत्मविश्वास निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला.
फोटो: ०९०४२०२१-कोल-कोल्हापूर कॅन्सर फोटो