वाणिज्य वृत्त: ब्रँडेड रेडिमेड गारमेंटस्‌ सेलला कोल्हापूरकरांचा भरघोस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:28 AM2021-01-16T04:28:42+5:302021-01-16T04:28:42+5:30

कोल्हापूर : पॅव्हेलियन हॉटेलमधील मधुसूदन हॉलमध्ये भरलेल्या ब्रँडेड रेडिमेड गारमेंटस्‌ सेलला कोल्हापूरकरांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. रविवारपर्यंत सुरू राहणाऱ्या ...

Commercial News: Branded Readymade Garments Cell responds to Kolhapurites | वाणिज्य वृत्त: ब्रँडेड रेडिमेड गारमेंटस्‌ सेलला कोल्हापूरकरांचा भरघोस प्रतिसाद

वाणिज्य वृत्त: ब्रँडेड रेडिमेड गारमेंटस्‌ सेलला कोल्हापूरकरांचा भरघोस प्रतिसाद

Next

कोल्हापूर : पॅव्हेलियन हॉटेलमधील मधुसूदन हॉलमध्ये भरलेल्या ब्रँडेड रेडिमेड गारमेंटस्‌ सेलला कोल्हापूरकरांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. रविवारपर्यंत सुरू राहणाऱ्या या सेलच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी तुडुंब गर्दी झाली होती. ब्रँडेड कपडे ८० टक्के सवलतीत मिळत असल्याने ग्राहकांच्या अक्षरश: उड्या पडल्या आहेत. अत्यंत कमी किमती लहानांपासून मोठ्यांपर्यंतचे कपडे एकाच ठिकाणी मिळत आहेत. जीन्स, शर्ट, टॉप, जाकीट, अंडरवेअर, जॉगिंग कपड्यांच्या असंख्य व्हरायटी आहेत. याशिवाय प्रवासी बॅगा, फुटवेअर, बूट यांच्याही नामवंत कंपन्यांची उत्पादने भरपूर व्हरायटीमध्ये उपलब्ध आहेत. बेली शूज, फ्लॅट हिल, सँडल्स, स्पोर्टस्‌ शूज, चप्पल यांच्याही व्हरायटी आहेत. असेंब्ली रोडवरील या हॉलमध्ये येऊन नामवंत कंपन्यांची उत्पादने अत्यंत कमी किमतीत खरेदी करण्यासाठी भेट द्या, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात येत आहे.

फाेटो: १५०१२०२१-कोल-मधुसूदन न्यूज

फोटो ओळ : पॅव्हेलियन हॉटेलमधील मधुसूदन हॉलमध्ये भरलेल्या ब्रँडेड रेडिमेड गारमेंटस्‌ सेलला कोल्हापूरकरांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Commercial News: Branded Readymade Garments Cell responds to Kolhapurites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.