वाणिज्य बातमी आवश्यक... ऑरेंज मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये उपचाराकरिता भरघोस सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:47 AM2020-12-17T04:47:57+5:302020-12-17T04:47:57+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या कहरानंतर काहीजणांना आर्थिक अडचणींसह विविध कारणांनी उपचार घेणे शक्य नाही, अशा सर्वांना दर्जेदार उपचार घेता यावेत, ...
कोल्हापूर : कोरोनाच्या कहरानंतर काहीजणांना आर्थिक अडचणींसह विविध कारणांनी उपचार घेणे शक्य नाही, अशा सर्वांना दर्जेदार उपचार घेता यावेत, याकरिता कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील ऑरेंज मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलतर्फे सवलतीच्या व अत्यंत वाजवी दरांत विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया व उपचार सुरू केले आहेत.
या उपचारांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया ४९९९ रुपयांत, उच्च रक्तदाब आणि मधुमेहावरील उपचार २४९९ रुपयांत, पाठ व कंबरदुखीसाठी सर्वसमावेशक सात दिवसांचा उपचार ३९९९ रुपयांत, नाॅर्मल डिलिव्हरी १५००० रुपये, सिझेरियन २५००० रुपये, गर्भाशयाची पिशवी अथवा गाठ काढण्याची शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ३५००० रुपये आणि टाक्याची शस्त्रक्रिया २५००० रुपयांत, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियावरील उपचार १०००० रुपयांत अशा विविध उपचारांचा समावेश आहे. वरील पॅकेजमध्ये सर्व संबंधित उपचारांच्या अनुषंगाने सर्व खर्च अंतर्भूत आहेत. त्यामुळे या खर्चाव्यतिरिक्त कोणतेही इतर छुपे खर्च आकारले जात नाहीत. विशेष म्हणजे अत्याधुनिक सुविधा व दर्जेदार वैद्यकीय सेवेसह सुसज्ज आयसीयू वाॅर्ड, ऑक्सिजन बेड, २४ तास डाॅक्टर आणि आपुलकीने वागणारा नर्सिंग स्टाफ आहे. सोबत पोषक आहार, रुग्ण आणि कुटुंबीयांचे समुपदेशन यांसह इतर सेवांसाठी ऑरेंज मल्टिस्पेशालिटीने अल्पावधीत नावलौकिक मिळविला आहे. बाहेरगावांहून येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या चहा आणि जेवणाची सोयदेखील हाॅस्पिटलतर्फे करण्यात येत आहे. प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला आणि दर बुधवारी मोफत तपासणी शिबिर आयोजित केले जाते. याचा लाभ जिल्हा व जिल्ह्याबाहेरील रुग्ण घेत आहेत. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन हाॅस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.