वाणिज्य बातमी : अमन होम ॲप्लायन्सेसमध्ये सुजल आईस वॉटर एअर कुलरचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:24 AM2021-02-13T04:24:42+5:302021-02-13T04:24:42+5:30
कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील फोर्ड कॉर्नर येथील पिसे बिल्डींग आणि शिवाजी रोड-आराम कॉर्नर येथील ज्योती वॉच कंपनीसमोरील अमन होम ॲप्लायन्सेसमध्ये ...
कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील फोर्ड कॉर्नर येथील पिसे बिल्डींग आणि शिवाजी रोड-आराम कॉर्नर येथील ज्योती वॉच कंपनीसमोरील अमन होम ॲप्लायन्सेसमध्ये आज, शनिवारपासून सुजल आईस वॉटर एअर कुलरचे प्रदर्शन आयोजित केले आहे. सकाळी साडेदहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. एसीसारखी थंड हवा देणारा ६ हजार ४०० रुपयांचा कुलर फक्त २८९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. १३ ते १८ फेब्रुवारीपर्यंतच प्रदर्शन राहणार आहे. त्यानंतर हाच कुलर ३९०० रुपयांना मिळणार आहे.
कोल्हापुरातील होम ॲप्लायन्सेस क्षेत्रामध्ये गेल्या १८ वर्षांपासून अमन होम ॲप्लायन्सेस कार्यरत आहे. गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, गॅस शेगडी, इलेक्ट्रीक गिझर, वॉटर एअर कुलर हे विविध मॉडेलमध्ये विक्रीसाठी ‘अमन’मध्ये उपलब्ध आहेत. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन आणि त्यांचा वेळ, श्रम, पैशाची बचत करण्याच्या उद्देशाने कोल्हापुरातील अमन होम ॲप्लायन्सेसने सुजल वॉटर एअर कुलर’ आणला आहे. बाहेरील तापमान ४० अंश सेल्सिअस असेल तर सुजल कुलर बसविल्यामुळे त्या घरातील तापमान १६ ते २२ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. इतर कुलरच्या तुलनेत सुजल आईस वाॅटर एअर कुलरमध्ये हनीपॅड व वाळामध्ये उपलब्ध असून, ६० वॅटची मोटर, जिचे विजेचे बिल फक्त १६ तासाला एक युनिट खर्च होते. कुलर डेमो (प्रात्यक्षिके) पाहण्यासाठी ग्राहकांनी अमन होम ॲप्लायन्सेसला भेट द्यावी. त्याचबरोबर नागपुरी डेजर्ट स्टील व मेटल कुलर २० लिटरपासून १०० लिटरपर्यन्त उपलब्ध आहेत. याच्या माहितीसाठी ९२७२७५११११ व ७०५८०५९९२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो : १२०२२०२१ कोल अमन कुलर न्यूज फोटो