वाणिज्य संजीवन रक्तपेढी रुग्णांसाठी वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:13 AM2020-12-28T04:13:49+5:302020-12-28T04:13:49+5:30
कोल्हापूर : संजीवनी ऱक्तपेढीचे कार्य हे रुग्णांना वरदान देणारे ठरले आहे, असे कौतुकोद्गार आरोग्य राज्यमंत्री राजेन्दर पाटील यड्रावकर ...
कोल्हापूर : संजीवनी ऱक्तपेढीचे कार्य हे रुग्णांना वरदान देणारे ठरले आहे, असे कौतुकोद्गार आरोग्य राज्यमंत्री राजेन्दर पाटील यड्रावकर यांनी काढले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या रक्तपेढीचे शिवाजी विद्यापीठ ते शाहू नाका रोडवरील ग्रीन पार्क येथे स्थलांतर करण्यात आले आहे. या नव्या वास्तूमधील कार्यालयाचे उद्घाटन यड्रावकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
रक्तपेढीचे अध्यक्ष सयाजी फराकटे म्हणाले, उत्तम सेवेमुळे ही रक्तपेढी नावारूपाला आली आहे. एच. आय. व्ही., काविळ, मलेरियासह विविध आजारांसाठीच्या रक्तचाचण्या येथे केल्या जातात. यावेळी सतीश मेटे, डॉ. श्रीधर पाटील, सूरज मगदूम, डॉ. प्रती रजपूत, डॉ. श्रध्दा मांडरे उपस्थित होते.
२७१२२०२० कोल संजीवनी रक्तपेढी
कोल्हापूर येथील संजीवनी रक्तपेढीच्या नूतन वास्तूचे उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री राजेन्दर पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सतीश मेटे, डॉ. श्रीधर पाटील, सूरज मगदूम, डॉ. प्रती रजपूत, डॉ. श्रध्दा मांडरे उपस्थित होत्या.