हाय कमांडच्या निर्णयाशी बांधील - मुख्यमंत्री येडीयुरप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:23 AM2021-07-26T04:23:56+5:302021-07-26T04:23:56+5:30
बेळगाव : भाजप पक्षाने मला सत्ता देत मोठं केलं असून, केंद्रीय हाय कमांड जो निर्णय देईल त्याला मी बांधील ...
बेळगाव : भाजप पक्षाने मला सत्ता देत मोठं केलं असून, केंद्रीय हाय कमांड जो निर्णय देईल त्याला मी बांधील आहे, असे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी स्पष्ट केले.
रविवारी दुपारी बेळगाव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढील वेळीदेखील कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेत आणणार आणि हेच माझे पुढील ध्येय असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, जे. पी. नड्डा यांच्यावर माझा विश्वास आहे. राज्यात दलित मुख्यमंत्री करावा की नाही, याबाबत हाय कमांड निर्णय घेईल. यासाठी आपण वाट पाहूया, असे येडीयुरप्पा म्हणाले.
बेळगाव जिल्ह्यात सर्वच जलाशय भरल्याने नुकसान झाले आहे. त्यासाठी नुकसान झालेल्या भागाची मी पाहणी करणार आहे. देवाच्या कृपेने काल कमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातदेखील पावसाचा जोर कमी झाला आहे. बेळगावसह कारवार जिल्ह्यातदेखील पावसाने अतोनात नुकसान झाले आहे, शक्य झाल्यास कारवार दौरा करून पाहणी केली जाईल, असे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, गोविंद कारजोळ, महसूलमंत्री आर. अशोक, मंत्री उमेश कत्ती आदी उपस्थित होते.
.
२५ बेळगाव येडीयुरप्पा व्हिजिट