बांधकाम कामगारांसह कुटुंबीयांनाही स्थैर्य देण्यासाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:25 AM2021-08-29T04:25:00+5:302021-08-29T04:25:00+5:30

म्हाकवेः ऊन,वारा,पाऊस याची तमा न बाळगता इतरांना निवारा निर्माण करण्याचे काम करणाऱ्या बांधकाम ...

Committed to providing stability to construction workers as well as families | बांधकाम कामगारांसह कुटुंबीयांनाही स्थैर्य देण्यासाठी कटिबद्ध

बांधकाम कामगारांसह कुटुंबीयांनाही स्थैर्य देण्यासाठी कटिबद्ध

Next

म्हाकवेः ऊन,वारा,पाऊस याची तमा न बाळगता इतरांना निवारा निर्माण करण्याचे काम करणाऱ्या बांधकाम कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांना स्थैर्य लाभेल यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, असे अभिवचन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. एकही कामगार या योजनेपासून वंचित राहू नये याची कार्यकत्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

म्हाकवे (ता कागल) येथे बांधकाम कामगार संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णयबद्दल,तसेच अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांकडून मुश्रीफ यांचा सत्कार, एनएमएनएस परीक्षेत यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार, कामगारांना माध्यान्ह योजनेचा शुभारंभ,त्यांना सुरक्षा किटचे वाटप मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.

स्वागत स्मिता पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी कामगारांना योजनेसह नोंदणीबाबत माहिती दिली. कार्यक्रमास बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह भोसले, दिनकर कोतेकर, रमेश पाटील,जी. एस. पाटील, डॉ. विजय चौगुले, जीवन कांबळे, दिलीप कांबळे, संतोष गायकवाड, अमोल कुंभार, हिंदुराव पाटील, एच. एन. पाटील, निवास पाटील, के.आर.पाटील, भारत लोहार, शिवाजी सुतार आदी उपस्थित होते. एस.के. पाटील यांनी आभार मानले.

कँप्शन

म्हाकवे येथील बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात कामगारांना साहित्य वाटप करताना ना. हसन मुश्रीफ यावेळी प्रवीणसिंह भोसले, दिनकर कोतेकर,रमेश पाटील आदी.

Web Title: Committed to providing stability to construction workers as well as families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.