सामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू व्हावा

By admin | Published: January 21, 2016 11:50 PM2016-01-21T23:50:42+5:302016-01-22T00:52:56+5:30

श्रीपाद नाईक : कुरुंदवाडात भाजपचा मेळावा; एस. के. पाटील चौकाचे नामकरण

The common man should be the center of development | सामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू व्हावा

सामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू व्हावा

Next

कुरुंदवाड : विकासाचा उपयोग स्वत:साठी केला तर तो विकास ठरत नाही. त्याला सामाजिक रूप देणे गरजेचे आहे. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून विकास केल्यास शहराचा पर्यायाने देशाचाच विकास होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
येथील डॉ. संजय पाटील विचार मंचतर्फे आयोजित सहकारमहर्षी एस. के. पाटील चौकाचे नामकरण व भाजप मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री नाईक बोलत होते. अध्यक्षस्थानी मयूर उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील होते, तर आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील माळभागातील एस. के. पाटील चौकाचे नामकरण मंत्री नाईक यांच्या हस्ते झाले.
नाईक म्हणाले, सहकारात नि:स्वार्थीपणे काम करून सहकाराची ताकद उभी केली तर कुणाकडेही हात पसरण्याची वेळ येणार नाही. मात्र, झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी चुकीच्या मार्गाने पैसा मिळविण्यासाठी चालविलेली चढाओढ देशाला घातक आहे. याविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येण्याची गरज आहे. ग्रामविकासासाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या थेट निधीचा ग्रामपंचायतीने योग्य विनियोग करावा.
आ. हाळवणकर म्हणाले, डॉ. संजय पाटील भाजपमध्ये आल्याने त्यांचा राजकीय वनवास संपला आहे. सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारा भाजप पक्ष असल्याने कार्यकर्त्यांसाठी आणि देशासाठीही ‘अच्छे दिन’ येणार आहेत.
यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, बाबा देसाई, नगराध्यक्षा मनीषा डांगे, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, आदींची भाषणे झाली. यावेळी तालुक्यातील नूतन सरपंच, जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राजेंद्र देशमुख, पोपट पुजारी, महावीर तकडे, भाजपचे तालुकाध्यक्ष धैर्यशील देसाई, जयपाल माणगावे, शंकर बिराजदार, गीतन यादव, सुधीर माळी, भीमराव पाटील, शिवाजी बीडकर, स्वप्निल श्रीधनकर यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. रामभाऊ मोहिते यांनी आभार मानले.


अब्दुललाटला भेट
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी अब्दुललाट ग्रामपंचायतीस भेट दिली. यावेळी सरपंच शानाबाई कोळी यांनी गावतलावाच्या सुशोभीकरणासाठी आणि अंतर्गत रस्त्यांसाठी निधीची मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, हिंदुराव शेळके, रविराज पाटील, अंकुश पाटील, रतन चौगुले, सागर सांगावे, अजित आडे, आदी उपस्थित होते.

Web Title: The common man should be the center of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.