राज्य सरकारच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:16 AM2021-07-22T04:16:01+5:302021-07-22T04:16:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगरूळ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने गेल्या पावणेदोन वर्षात सामान्य माणूस केंद्रबिंदू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगरूळ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने गेल्या पावणेदोन वर्षात सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केले. सरकारचे काम सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन कुंभी कासारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. सांगरूळ (ता. करवीर) येथे शिवसंपर्क अभियानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार होते.
जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात डॉक्टरांच्या समवेत अंगणवाडी सेविका अशा सेविकांनी देवदूताप्रमाणे काम केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या संदेशाप्रमाणे शिवसैनिकांनी ‘माझे गाव माझी जबाबदारी’ ही भूमिका ठेवून काम करावे. तसेच घर तिथे शिवसेना पोहोचवण्याची काम शिवसैनिकांनी करावे. शिवाजी पाटील, सुरेश चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. कुंभी कासारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष निवास वातकर, सरपंच सदाशिव खाडे, उपसरपंच सुशांत नाळे, हर्षल सुर्वे, करवीरचे माजी सभापती रवींद्र मडके, जिल्ह परिषदेचे माजी सदस्य बाजीनाथ खाडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कृष्णात खाडे, प्रशांत नाळे, जनार्दन खाडे, राजाराम खाडे आदी उपस्थित होते. युवासेनेचे अक्षय चाबूक यांनी स्वागत केले. अनिल घराळ यांनी आभार मानले.
फोटो ओळी : सांगरूळ (ता. करवीर) येथे शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात चंद्रदीप नरके यांनी मार्गदर्शन केले. या वेळी बाजीनाथ खाडे, हर्षल सुर्वे, संजय पवार, रवींद्र मडके आदी उपस्थित होते. (फोटो-२१०७२०२१-कोल-सांगरुळ)