समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतली अध्यक्षांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 05:32 PM2020-02-29T17:32:50+5:302020-02-29T17:33:43+5:30
जिल्ह्यातील समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रियेअंतर्गत पिंपरी-चिंचवड येथे प्रशिक्षणासाठी गेलेल्या १२० पैकी ६० डॉक्टरांना जागा रिक्त नसल्याने लोणी (जि. अहमदनगर) येथे जाण्यास सांगितले आहे. या सर्वांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांची भेट घेऊन लोणीऐवजी कोल्हापूर किंवा पुणे येथे प्रशिक्षणाची सोय करावी, अशी मागणी केली.
कोल्हापूर : जिल्ह्यातील समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रियेअंतर्गत पिंपरी-चिंचवड येथे प्रशिक्षणासाठी गेलेल्या १२० पैकी ६० डॉक्टरांना जागा रिक्त नसल्याने लोणी (जि. अहमदनगर) येथे जाण्यास सांगितले आहे. या सर्वांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांची भेट घेऊन लोणीऐवजी कोल्हापूर किंवा पुणे येथे प्रशिक्षणाची सोय करावी, अशी मागणी केली.
पिंपरी-चिंचवड येथे १२० जणांच्या प्रशिक्षणाची सोय असल्याचे दाखविण्यात आल्याने तितके डॉक्टर्स पाठविण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कोल्हापूरच्या ६० पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींची सोय येथे होणार नसल्याचे तेथील प्रमुखांनी कळविले आहे.
तेथे अन्य जिल्ह्यांचे उमेदवार घेण्यात आले आहेत. या सर्व प्रशिक्षणार्थींनी या तिघांची भेट घेऊन यातून मार्ग काढण्याची विनंती केली. त्यानुसार आता याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला.