अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नुकसान भरपाईचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 06:02 PM2017-09-14T18:02:40+5:302017-09-14T18:11:08+5:30
कोल्हापूर शहरामध्ये बुधवारी रात्री कोसळलेल्या पाऊसामध्ये ज्या नागरीकांचे नुकसान झाले आहे, अशांचे पंचनामा करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. याची नुकसान भरपाई राज्य शासन देईल, मात्र, हे का झाले याचीही चौकशी करेल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी केले.
कोल्हापूर : बुधवारी रात्री शहरामध्ये कोसळलेल्या पाऊसामध्ये ज्या नागरीकांचे नुकसान झाले आहे, अशांचे पंचनामा करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. याची नुकसान भरपाई राज्यशासन देईल. मात्र, हे का झाले याचीही चौकशी करेल. असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी केले.
ताराबाई पार्क येथील सर विश्वेश्वरय्या हॉल येथे झालेल्या भाजपा-ताराराणी आघाडी पक्ष कार्यकर्ता मेळावा व प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.
पालकमंत्री म्हणाले, अवकाळी पावसामुळे बुधवारी रात्री ज्या नागरीकांचे नुकसान झाले आहे. हे का झाले याचीही चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना आदेश दिले आहे. रेडझोन सारखा गंभीर विषय आहे. यात हात घालण्याची आवश्यकता आहे. मी तुम्हाला आश्वासित करतो की, या शहरात कोणतेही बेकायदेशीर कृत्य सरकार चालु देणार नाही. रेडझोन संदर्भात योग्य निर्णय घेऊ .