प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची उपनगराध्यक्षांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:16 AM2021-06-11T04:16:54+5:302021-06-11T04:16:54+5:30
गावभाग परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणावरून डॉक्टर व वकील यांच्यात वादावादी झाली होती. तसेच काही लसीकरण केंद्रांतून लसीचा काळाबाजार ...
गावभाग परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणावरून डॉक्टर व वकील यांच्यात वादावादी झाली होती. तसेच काही लसीकरण केंद्रांतून लसीचा काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी होत आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत लसीकरण मोहिमेत अनेक समस्या निर्माण होत असल्यामुळे वयोवृद्ध नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तसेच केंद्रातील आरोग्य अधिकारी यांच्याबरोबर लोकप्रतिनिधी व नागरिकांचे अनेकवेळा वादावादीचे प्रसंग घडत आहेत. यावर झालेल्या चर्चेदरम्यान कोरोना लसीकरण मोहिमेत कोणतीही अडचण आल्यानंतर थेट माझ्याशी संपर्क साधावा, अशी सूचना मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी केली. तर उपनगराध्यक्ष पोवार यांनी शहरातील सर्व प्राथमिक नागरी केंद्रामध्ये नियमानुसार लसीकरण करावे. तसेच वयोवृद्ध नागरिकांचे लसीकरण प्राधान्याने आणि कोणत्याही प्रकारची तक्रार न येता करावे, असे आवाहन केले.
चौकट
आम्ही दिवसभर लसीकरण सुरू करू
प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी चर्चेदरम्यान लसीचा पुरवठा कमी होत असून, मागणी अधिक आहे. पुरवठा व नियमानुसार लसीकरण सुरू आहे; परंतु प्रशासनाने मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून दिल्यास आम्ही दिवसभर नागरिकांची सेवा करून लसीकरण करू, असे सांगितले.
फोटो ओळी
१००६२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत लसीकरण केंद्रावरील समस्यांबाबत नगरपालिकेत आढावा बैठक झाली. या वेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, आदींसह केंद्रप्रमुख उपस्थित होते.