गुंडाकडून खंडणीसाठी धमकी देत असल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 01:02 PM2020-11-12T13:02:30+5:302020-11-12T13:04:09+5:30
police, crimenews, kolhapurnews पोलीस रेकॉर्डवरील गुंड काळबा गायकवाड याचा मुलगा सिद्धार्थ गायकवाड याने खंडणीसाठी धमकी दिल्याची तक्रार टेंबलाईवाडी येथील साईप्रसाद मांडरेकर (वय २५) यांच्यावतीने त्याचे वडील किरण मांडरेकर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्याकडे भेटून बुधवारी केली. काकडे यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले.
कोल्हापूर : पोलीस रेकॉर्डवरील गुंड काळबा गायकवाड याचा मुलगा सिद्धार्थ गायकवाड याने खंडणीसाठी धमकी दिल्याची तक्रार टेंबलाईवाडी येथील साईप्रसाद मांडरेकर (वय २५) यांच्यावतीने त्याचे वडील किरण मांडरेकर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्याकडे भेटून बुधवारी केली. काकडे यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले.
पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार काळबा गायकवाड याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या होत्या. त्याचा मुलगा सिद्धार्थ गायकवाड याने गेल्या महिन्यापासून टेंबलाईवाडी येथील साईप्रसाद मांडरेकर या युवकाला दरमहा १५ हजार रुपयांची खंडणी द्यावी, यासाठी मोबाईलवरून तसेच घरी गुन्हेगारी तरुण पाठवून धमकी दिली जात आहे.
त्यामुळे या त्रस्त झालेल्या मांडरेकर याने सिद्धार्थकडून आपल्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, अशी कैफियत मांडली. त्यामुळे गायकवाड याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी साईप्रसादच्या वडिलांना बुधवारी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. काकडे यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना सूचना केल्या आहेत.