वाहन चोरीची तक्रार आता आॅनलाईन
By admin | Published: May 27, 2016 11:09 PM2016-05-27T23:09:35+5:302016-05-27T23:14:55+5:30
तक्रारदारांसाठी सुविधा : पोलिस महासंचालकांची संकल्पना
कोल्हापूर : माहिती व तंत्रज्ञानाचा वेध घेत पोलिस दलानेही कात टाकण्यास सुरुवात केली आहे. आता वाहनचोरी झाल्यानंतर (दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी) पोलिस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार नोंदविण्याचा विलंब लक्षात घेता, वाहनचालकाला आॅनलाईन तक्रार नोंदविता येणार आहे. पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या संकल्पनेतून हे साकार झाले आहे.
काही वेळा पोलिस ठाण्यामध्ये वाहनचोरीची तक्रार तत्काळ नोंदविली जात नाही. त्यामुळे चोरी झालेल्या वाहनाची तक्रार सर्वसामान्य लोकांना नोंदविता यावी यासाठी आॅनलाईन तक्रारीची सुविधा सुरू करण्यात आली आहे. लोकांनी आपले वाहन चोरीस गेल्याचे पोलिस ठाण्यामध्ये न जाता महाराष्ट्र पोलिस विभागामार्फत ६६६.५ंँंल्लूँङ्म१्र३ं‘१ं१.ूङ्मेनावचे पोर्टल उघडून त्यामध्ये प्रथम आपण नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. नोंदणी करणाऱ्याने आपल्या संगणक किंवा मोबाईलवर इंटरनेट कनेक्शनद्वारे या कॉलमवर नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर नोंदविणाऱ्याला त्याच्या मोबाईल व ई-मेलवर ओटीपी (वन टाईम पासवर्ड) प्राप्त होईल. तो भरल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर त्यात मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन केल्यानंतर येणाऱ्या पोर्टलवर तुमच्या चोरीस गेलेल्या वाहनाची तक्रार नोंदवू शकता.
पूर्ण महाराष्ट्रात चोरीस गेलेल्या वाहनाची माहिती महासंचालक कार्यालयात एकत्रित होणार आहे. त्याचबरोबर बेवारस स्थितीत मिळून आलेल्या वाहनांची नोंदणी पोर्टलमध्ये करण्यात येणार असून सदर मिळालेले बिनधनी वाहन कोठून चोरीस गेले याची माहिती तत्काळ माहिती मिळण्याची सुविधा आहे.
या स्मार्ट प्रणालीचा वापर करण्याबाबतचे प्रशिक्षण कोल्हापूर पोलिस दलातील पोलिस ठाण्यांच्या नोडल आॅफिसर्सना पोलिस
अधीक्षक कार्यालय येथे देण्यात आलेले आहे.
कॉलममध्ये हे नोंद करा...
६६६.५ंँंल्लूँङ्म१्र३ं‘१ं१.ूङ्मे
वेबसाइटवर जाऊन तेथे स्वत:चा मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, आधार कार्ड नंबर, स्वत:चे नाव, पासवर्ड आदी माहिती भरावी
वाहन चोरीस गेल्यास तत्काळ चोरीस गेलेल्या वाहनाची माहिती, वाहनचोरी तक्रार पोर्टलवर नोंदवावी. याकरिता सर्व कोल्हापूरवासीयांनी या पोर्टलवर स्वत:ची नोंदणी करावी.
- प्रदीप देशपांडे, जिल्हा पोलिस अधीक्षक, कोल्हापूर.